Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedनायलॉन मांज्याविरोधातील कारवाई सुरूच ठेवा-खंडपीठाचे आदेश

नायलॉन मांज्याविरोधातील कारवाई सुरूच ठेवा-खंडपीठाचे आदेश

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

संक्रांत संपली म्हणून नायलॉन मांजाविरोधी (Nylon Manja) कारवाईत खंड पडता कामा नये, असे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुनावणी प्रसंगी प्रशासनाला बजावले. ई-कॉमर्स साईटवरून घरपोच मांजा कुणालाही मिळणार नाही, यासंबंधी दक्षता बाळगण्याचे निर्देश न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी दिले आहेत.

- Advertisement -

औरंगाबाद खंडपीठात दाखल सुमोटो जनहित याचिकेत केंद्राला शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. राज्य शासनाने कारवाईसंबंधीचा अहवाल सादर केला. अँड. सिद्धेश्‍वर ठोंबरे यांनी मागील सुनावणीत ई-कॉमर्स साईटवरून घरपोच नायलॉन मांजा उपलब्ध करून दिला जातो, असे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. अशा साईटवर कारवाईची मागणी केली. अशा साईट बंद करण्याचे आदेश खंडपीठाने यापूर्वी दिले होते. त्यासंबंधी काय कारवाई केली, अशी विचारणाही केली. न्यायालयाचे मित्र म्हणून अँड. सत्यजित बोरा यांनी बाजू मांडली. केंद्रातर्फे अँड. अजय तल्हार तर राज्याच्या वतीने अँड. ज्ञानेश्‍वर काळे यांनी काम पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या