Friday, April 26, 2024
HomeUncategorizedअतिरिक्त 'सुरक्षा ठेव' बिलाबाबत संभ्रम!

अतिरिक्त ‘सुरक्षा ठेव’ बिलाबाबत संभ्रम!

औरंगाबाद – aurangabad

वीज ग्राहकांना (MSEDCL) महावितरणकडून अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाले असून ही कोणते बिल, हे भरायचे की नाही याबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र सदरील बिल हे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (Maharashtra Electricity Regulatory Commission) आदेशाप्रमाणे नियमानुसार असून जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना दरवर्षी मिळणारी व्याजाची रक्कम (Electricity bill) वीज बिलामध्ये समयोजित केली जाते, असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे.

- Advertisement -

महावितरणकडून बहुवर्षीय वीज दर विनिमय २०१९ नुसार वीज दर ठरवून मिळावेत यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावासंबंधी आयोगाने ३० मार्च २०२० रोजी आर्थिक वर्ष २०२०-२१ ते आर्थिक वर्ष २०२४-२५ पर्यंतच्या ५ वर्षांच्या कालावधीसाठी बहुवर्षीय वीज दराचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार महावितरणच्या विविध ग्राहक वर्गवारीसाठी १ एप्रिल २०२० पासून लागू असणारे बीजदर निश्चित केले आहेत. सध्या १ एप्रिल २०२२ पासून लागू असलेल्या वीजदरानुसार महावितरणकडून वीज बिलांची आकारणी करण्यात येत आहे. यातील बहुतांश वर्गवारीतील वीजदर मागील वर्षीच्या दराच्या पातळीवर ठेवण्यात आल्याने वीजग्राहकांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. यासोबतच सद्यस्थितीत वीज ग्राहकांना नियमित वीज बिलांसह अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

मात्र, सुरक्षा ठेवीचे बिल हे नियमानुसारच असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. विद्युत्‌ नियामक आयोगाने विद्युत पुरवठा संहिता, वितरण परवानाधारकांच्या कृतीचे मानके व पॉवर क्नॉलिटी विनिमय २०२१ ‘च्या मसुद्यावर हितसंबंधितांकडून तसेच परवानाधारकांकडून सूचना, हरकती, अभिप्राय मागविले होते व ते विचारात घेऊन २५ फेब्रुवारी २०२१ रोजी सदर विनिमय जारी केले आहे. त्यातील विनिमय क्र.१३ नुसार ग्राहकांची सुरक्षा ठेव सरासरी देयकाच्या दुप्पट तसेच त्रैमासिक बिलिंग असलेल्या ग्राहकांची सुरक्षा ठेव दीडपट करण्याची करण्याची तरतूद विद्युत नियामक आयोगाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, सदरील बिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

बिल आयोगाच्या तरतुदीनुसार

विद्युत नियामक आयोगाच्या तरतुदीनुसार महावितरणकडून वीज ग्राहकांना संबंधित आवश्यक सुरक्षा ६ ठेवीमधील रकमेच्या फरकाचे स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. तसेच जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवर दरवर्षी स्वतंत्र परिपत्रक काढून व्याज देण्यात येत असते. त्यामुळे सुरक्षा ठेवीची बिल भरावे लागणार आहे.

सरसकट वीज दरवाढ नाहीच

आयोगाकडून करण्यात आलेल्या बहुवार्षिक वीज दराच्या निश्चितीकरणानुसार १ एप्रिल २०२२ पासून नवीन वीज दर लागू करण्यात आले आहेत. यामध्ये बहुतांश वर्गवारीचे दर सन २०२१-२२ मध्ये लागू असलेल्या वीज दराच्या पातळीवरच ठेवले आहेत. त्यामुळे सरसकट वीज दरवाढ झाल्याचा आरोप देखील चुकीचा असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या