योजनांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधणार

पालकमंत्री संदीपान भुमरे
योजनांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधणार

औरंगाबाद Aurangabad

जनतेच्या कल्याणासाठी (welfare of the people) शासन (Government) अनेक योजनांची अंमलबजावणी (Implementation of plans) करत असते. जिल्हा नियोजन समितीच्या (District Planning Committee) माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीतून (fund) अनेक विकासकामे (Development works) पूर्ण करण्याला प्राधान्य राहणार आहे. या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार असल्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे (Guardian Minister Sandipan Bhumre) यांनी सांगितले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पेालिस अधीक्षक मनीष कलवानिया व्यासपीठावर तर आमदार हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब, नारायण कुचे, सतीश चव्हाण, रमेश बोरनारे, उदयसिंग राजपूत, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, विक्रम काळे आदी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरूवातीला जिल्हाधिकारी पांडेय यांनी सन 2022-23 या आर्थ‍िक वर्षामध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण),  अनुसूचित जाती उपयोजना (SCP ) व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना (ओटीएसपी) या योजनांसाठी  अर्थसंकल्पित तरतूद, प्राप्त तरतूद, वितरीत निधी व सप्टेंबर, 2022 अखेर झालेला खर्च याबाबतचा तपशील दिला.

पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या सुमारे तीन हजार गेटच्या दुरूस्तीसाठी, शेतकऱ्यांच्या शेतातील डी.पी. भरीव तरतूद करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक स्मशान भूमींची दूरवस्था झालेली आहे. तर काही  जागेअभावी पूर्णत्वास गेलेल्या नाहीत.

जनसुविधा मधून जिल्ह्यातील सर्व स्मशानभूमी पूर्ण करण्यात येणार आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्ह्यातील सर्व विकासकामे पूर्णत्वास नेणार आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नेहमीच प्राधान्य राहणार असल्याचेही पालकमंत्री म्हणाले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत आलेल्या निधी आणि शहरातील रस्ते, अमृत पाणी पुरवठा योजनांबाबत माहिती विचारली असता याबाबत  महापालिका आयुक्त अभिजित चौधरी यांनी सविस्तर माहिती दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com