corona test
corona test

औरंगाबाद : करोना चाचणीसाठी व्यापाऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद

जिल्ह्यात पुन्हा ३६ रुग्णांची भर, रुग्णसंख्या १० हजार ८३९

औरंगाबाद - प्रतिनिधी - Aurangabad

जिल्ह्यात करोनाचा कहर सुरूच असून रविवारी १८६ व्यापाऱ्यांना करोना संसर्ग झाल्याचे समोर आले असताना सोमवारी सकाळच्या सत्रात ३६ रुग्णांची भर पडली आहे.

दि.१० ते १८ जुलैच्या लॉकडाऊन काळात दरदिवशी २०० पेक्षा जास्त करोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले. जनता कर्फ्यू उठल्यावर प्रशासनाच्या वतीने व्यापाऱ्यांची करोना टेस्ट घेण्याचा उपक्रम चालू केला आहे.

व्यापाऱ्यांकडून संमिश्र प्रतिसाद

काही व्यापारी स्वतःहून तपासणीसाठी पुढे येत असले तरी बहुतांशी व्यापारी आपल्याला टेस्ट करायची नाही, भलेही दुकान उघडू देऊ नका अशी विचित्र भूमिका घेताना दिसत आहेत. मराठवाड्यातील जवळपास सर्वच शहरी तथा ग्रामीण भागात करोनाने शिरकाव केल्याचे दिसून येत आहे.

Last updated

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com