Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedऔरंगाबाद-फर्दापूर मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा-जिल्हाधिकारी

औरंगाबाद-फर्दापूर मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा-जिल्हाधिकारी

ओैरंगाबाद – aurangabad

(Tourism) पर्यटनाच्या दृष्टिकोनातून औरंगाबाद ते (Fardapur) फर्दापूर (National Highways) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 एफ हा अत्यंत महत्वाचा आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर पर्यटन वाढून जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार असल्याने या मार्गातील मोठे पूल वगळता इतर कामे मे अखेर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) यांनी दिले.

- Advertisement -

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज हर्सुल ते फर्दापूर ह्या राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी संजीव मोरे, तहसिलदार राजपूत, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता ओंकार चांडक, उप अभियंता अभिजित घोडेकर, कनिष्ठ अभियंता कल्याणी पाटील तसेच संबंधित कंत्राटदार उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले की, औरंगाबाद ते फर्दापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 एफ हा अत्यंत महत्वाचा आहे. रस्त्याचे काम अधिक वेगाने करणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवरचे खड्डे बुजविण्याचे काम सुरू असून हे काम लवकरात लवकर पूर्ण करुन प्रवास सुरक्षित होईल हे पहावे. काही ठिकाणी सिमेंटच्या रस्त्यांवर पाणी टिकून राहण्यासाठी ओले पोते टाकण्यात आले आहेत त्या ऐवजी वाफे करावेत जेणेकरुन रस्त्याला सम प्रमाणात पाणी मिळेल आणि रस्त्याचा दर्जा सुधारेल. सिल्लोड जवळील भवन येथील सिध्देश्वर विद्यालय परिसरात मेडियनची रुंदी कमी करुन 1.50 मीटर करता येईल का हे तपासावे. ह्या परिसरा व्यतिरिक्त मेडियनची रुंदी 2.50 मीटर एवढी ठेवण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

(Ajanta) अजिंठा गावाजवळ राजेंद्र जयस्वाल यांनी रस्त्याचे काम थांबविले असल्याने ह्या प्रकरणाची तपासणी करावी. रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण केल्यास संबंधितांवर कारवाई करावी. गोळेगांव येथील नाल्याचा नैसर्गिक प्रवाह गांव नकाशावरून तपासावा तसेच अजिंठा गावालगतच्या मुळ रस्त्यांची तपासणी करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी संजय मोरे आणि तहसिलदार राजपूत यांना दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या