Friday, April 26, 2024
HomeUncategorizedदृष्टी गमावलेल्या चौघांना तात्काळ भरपाई द्या-औरंगाबाद खंडपीठाचा आदेश

दृष्टी गमावलेल्या चौघांना तात्काळ भरपाई द्या-औरंगाबाद खंडपीठाचा आदेश

औरंगाबाद – aurangabad

उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड (Sub-District Hospital Sillod) आणि जिल्हा रुग्णालय (District Hospital) आमखास मैदान यांच्या वतीने आयोजित मोफत शस्त्रक्रिया शिबिरात चार रुग्णांची दृष्टी गेली होती. त्यामुळे भरपाई मिळावी, अशी विनंती करणारी याचिका संबंधितांनी दाखल केली होती. या प्रकरणात (Mumbai High Court) मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी राज्य शासनास नोटीस बजावली होती. दरम्यान, दृष्टी गेलेल्या रुग्णांना नुकसान भरपाईसंबंधी योजना अस्तित्वात असेल तर तात्काळ भरपाई मंजूर करावी, असे निर्देश (Aurangabad Bench) औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.

- Advertisement -

कोरोना काळात १४ एप्रिल २०२१ रोजी सिल्लोड तालुक्यातील १४ रुग्णांवर औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयात डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली होती. यातील दहा रुग्णांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली, मात्र चार रुग्णांची दृष्टी गेली होती. त्यामुळे लॉकडाऊनमुळे रुग्णांना काहीही काम करता आले नाही. वामन बंडू पाटील, कांताबाई सोनाजी लोखंडे, गणपत महादू पडूळ व इतर एकाने त्याविरोधात खंडपीठात याचिका दाखल केली. आम्हाला नुकसान भरपाई मिळावी तसेच कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र बहाल करण्याची विनंती केली. अॅड. दिगंबर साठे यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली. त्यावर न्यायालयाने भरपाई देण्याचे आदेश दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या