Wednesday, May 8, 2024
HomeUncategorized4 जी डाऊनलोड स्पीडमध्ये 'ही' कंपनी अव्वल

4 जी डाऊनलोड स्पीडमध्ये ‘ही’ कंपनी अव्वल

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani, Owner Reliance Industries) यांची कंपनी रिलायन्स जिओ पुन्हा एकदा 4G डाउनलोड स्पीडमध्ये (4G download speed) अव्वल असल्याचे सिद्ध झाले आहे….

- Advertisement -

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने ऑक्टोबर महिन्यासाठी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जिओ चा सरासरी 4G डाउनलोड स्पीड 21.9 Mbps इतका मोजला गेला. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत 1 एमबीपीएसची वाढ झाली असून सप्टेंबर महिन्यात जिओ चा 4G डाउनलोड स्पीड 20.9 Mbps होता.

टेलिकॉम क्षेत्रातील तीन प्रमुख कंपन्यांचा 4G स्पीड वाढला आहे. रिलायन्स जिओच्या मागे असलेल्या एअरटेलने 13.2 Mbps 4G डाउनलोड स्पीड नोंदवला. सप्टेंबरच्या तुलनेत त्याच्या वेगात 1.3Mbps ची किंचित वाढ झाली आहे.

ऑक्टोबरमध्ये, वी इंडियाची सरासरी 4G डाउनलोड गती 15.6 Mbps इतकी मोजली गेली. वी ने भारती एअरटेल तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे समोर येत आहे.

मायस्पीड ऍप्लिकेशनच्या मदतीने गोळा केलेल्या रिअल टाइम डेटाच्या आधारे TRAI द्वारे सरासरी वेग मोजला जात असतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या