
औरंगाबाद - aurangabad
(Central Government) केंद्र सरकारने खाद्यतेलावरील (Edible oil) सीमा शुल्क दोन वर्षासाठी रद्द केल्याने तसेच इंडोनेशियाने (Indonesian) पाम तेलावरील निर्यातबंदी मागे घेण्याची नुकतीच घोषणा केली. त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवर झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. खाद्यतेलाचा दर आठ दिवसांच्या तुलनेत (Soybean) सोयाबीनसह अन्य काही खाद्यतेलाचे भाव लिटरमागे ७ ते ८ रुपयांनी घसरले आहेत.
ऑगस्ट २०२० मध्ये करडई तेलाचे भाव लिटर मागे १५४ रुपये, शेंगदाणा १३४ रुपये, सोयाबीन ८८ रुपये, सूर्यफूल ९८ रुपये, तीळ तेल १६० रुपये, मोहरी १३० रुपये तर सरकी ८८ तर पाम तेलाचे दर त्यावेळेस ८६ रुपये प्रती लिटर होते. पण, त्यानंतर खाद्यतेलाच्या दरात सातत्याने भाववाढ होत गेली.
मध्यंतरी केंद्र सरकारने पाम, सोयाबीनसह सूर्यफुलाच्या कच्च्या तेलाच्या आयात शुल्कात काहीशी कपात केली तसेच कृषी उपकरही कमी करीत दरवाढीला रोख लावण्याचा प्रयत्न केला होता. तर रशिया-युक्रेन युद्धामुळे खाद्यतेलाच्या किंमतीवर परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळाले.
दरम्यान, महागाईने त्रस्त झालेल्या ग्राहकांसाठी काहीशी दिलासाजनक बाब म्हणजे गेल्या आठ दिवसांच्या तुलनेत सोयाबीन, सूर्यफुल, सरकीसह पामतेलाच्या दरात घसरण झाली आहे. यात १६८ रुपयांना मिळणारे सोयाबीन सध्या १६० रुपये प्रती लिटर झाले आहे. सूर्यफुल तेलही लिटरमागे सात रुपयांनी स्वस्त झाले असून सध्या १७८ रुपये दर आहे. तर सरकी व पामतेलाचे दर लिटरमागे चार रुपयांनी घसरले असून अनुक्रमे १६० रुपये आणि १५८ रुपये प्रतिलिटर सध्याचे दर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.