जिल्हाधिकारी राम यांचा अजित पवारांकडून सन्मान
अन्य

जिल्हाधिकारी राम यांचा अजित पवारांकडून सन्मान

प्रधानमंत्री कार्यालयात उपसचिव पदी निवड

Arvind Arkhade

पुणे|प्रतिनिधी|Pune

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची प्रधानमंत्री कार्यालयात उपसचिव पदी निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.पुण्याच्या प्रश्नांची जाण असणारे अधिकारी नवल किशोर राम यांना प्रधानमंत्री कार्यालयात काम करण्याची संधी मिळाली आहे, ही चांगली बाब असून पुण्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राम प्रयत्न करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, ‘पीएमआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर तसेच विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते

डॉ. श्रीकर परदेशी यांची पुण्यातून चार वर्षांपूर्वी थेट पंतप्रधान कार्यालयात बदली झाली होती. तसंच महापालिका आयुक्त पदावर असताना कुणाल कुमार यांची केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी संचालक पदावर नियुक्ती झाली होती. त्यानंतर नवल किशोर राम हे तिसरे अधिकारी आहेत जे पुण्यातून पंतप्रधान कार्यालयात पोहचले आहेत.

नवल किशोर राम 2008 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. मागच्या २ वर्षांपूर्वी त्यांची पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली होती. आज बदली झाल्याने ते इथून पुढच्या चार वर्षांसाठी प्रतिनियुक्तीवर केंद्रामध्ये जात आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com