औरंगाबाद शहरात ढगफुटी!

सखल भागात घरांमध्ये पाणी
औरंगाबाद शहरात ढगफुटी!

औरंगाबाद- Aurangabad

आज ७ सप्टेंबर २०२१ रोजी रोजी औरंगाबाद शहरावर  Aurangabad city रात्री ७:१० ला सुरू झालेल्या मुसळधार पावसाने heavy rain पुढील दोन तीन मिनीटात, म्हणजे ७:१२ वाजण्याच्या दरम्यान अतिशय रौद्ररूप धारण केले व ८:१० या एका तासाच्या कालावधीत ढगफुटीपेक्षा जास्त वेगाने Heavy rain पाऊस झाला. 

सुरुवातीच्या तीस मिनिटाच्या काळात (७:४० पर्यंत) पाऊस पड़ण्याचा सरासरी वेग हा १६६.७५ मीमी हा नोंदला गेला व या तीस मिनिटांच्या कालावधीत ५६.२ मी.मी पावसाची नोंद झाली. म्हणजेच औरंगाबाद शहरावर ढगफुटीपेक्षा वेगाने झोडपून काढले. (ताशी शंभर मी. मी. किंवा जास्त पाऊस झाल्यास ढगफुटी म्हंटली जाते)

रात्री ७:४० नंतर पावसाच वेग थोडा कमी होत गेला, ०७:५० पर्यंत सरासरी ८६.९ मी मी वेग होता व नंतर ८:१० पर्यंत तो कमी होत ५३.२४ मीमी प्रति तास पावसाचा वेग राहिला. तर सायंकाळी ७:१० ते ८:१० या एका तासात ८७.६ मी. मी. औरंगाबाद शहरात पावसाची नोंद झाली

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com