ऐतिहासिक वास्तू , किल्ल्यांमध्ये स्वच्छता मोहीम

तरुणींचा मोठा सहभाग
ऐतिहासिक वास्तू , किल्ल्यांमध्ये स्वच्छता मोहीम

औरंगाबाद - aurangabad

जिल्ह्यातील ऐतिहासिक वारशांचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने या ऐतिहासिक वास्तू, किल्ल्यांमध्ये (Cleanliness campaign) स्वच्छता मोहीम (Collector's Office) जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील तरुणींच्या साहाय्याने राबविण्यात येते आहे. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून यात तरुणींनी उत्स्फूर्त सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) केले.

ऐतिहासिक वास्तू , किल्ल्यांमध्ये स्वच्छता मोहीम
इंदोर-अमळनेर बस अपघात ; दहा मृतदेहांची ओळख पटली

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत दौलताबाद येथील दौलताबाद किल्ला व परिसरात तरुणींनी स्वच्छता मोहीम आज राबविण्यात आली. या मोहिमेचे कौतुक करत जिल्हाधिकारी यांनी आजपासून गड किल्ल्यांचे संवर्धन आणि स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे, असेही सांगितले. दौलताबाद किल्ला परिसरात राबविण्यात आलेल्या मोहिमेत उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार विजय चव्हाण, पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे, पोलीस उपनिरीक्षक गोवर्धन चव्हाण, मंडळ अधिकारी बी.आर.गुसिंगे, तलाठी एस.एम.मुळे, प्रियंका जगताप, मिलिंद साठे, पुरातत्त्व विभागाचे संरक्षण सहायक संजय रोहनकर, एस. एस. नीळ, मोहमद एजाज, आर. डी. घाटे, सीताराम धनायत, आसाराम काळे, फकिरचंद गायकवाड, बाबासाहेब आढाव, गिर्यारोहक योगेश्वरी बोहरे आदींसह तरुणींची बहुसंख्येने उपस्थिती होती.

कन्नड येथील अंतुर किल्ल्यावर स्वच्छता करण्यात आली. यावेळी जनार्धन विधाते उपविभागीय दंडाधिकारी (कन्नड),तहसीलदार संजय वरकड, वनविभागाची संपूर्ण टीम व इतर शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या मोहिमेमध्ये पुढाकार घेतल्यामुळे इतर तरुणींमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मोहिमेच्या सुरवातीलाच गड सुरक्षा अधिकारी सुनील गैर यांनी अंतुर किल्याचा इतिहास सांगत तरुणींना माहिती दिली. मोहिमेच्या शेवटपर्यंत सर्व शासकीय अधिकरी आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

मोहिमेत सहभागी तरुणींनी जिल्हाधिकारी कार्यालयातमार्फत उपलब्ध करून दिलेल्या सुविधेबद्दल जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व उपविभागीय दंडाधिकारी जनार्धन विधाते यांचे आभार मानले. तरूणींसाठी स्थानिक व्यवस्था तहसीलदार संजय वरकड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती. या मोहिमेत ५० पेक्षा अधिक तरुणींचा सहभाग होता.

यावेळी तहसीलदार संजय वरकड,अनिल पाटील(वनपाल), एस.आर.पवार वनरक्षक, मंडळ अधिकरी एस. बी देशपांडे., टी. के. वळकर मंडळ अधिकरी,ग्रामपंचायत कर्मचारी नागापूर, कोतवाल अनिल मोकासे, राजू खरात, तलाठी एस ऐ जांबूतकर, जी एस मोहिते. नागराव ढंगारे राजू मुळे, अधिकराव ढोने आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com