Friday, April 26, 2024
HomeUncategorizedहेल्पलाईन 'समाधान'वर तक्रारींचा पाऊस! 

हेल्पलाईन ‘समाधान’वर तक्रारींचा पाऊस! 

औरंगाबाद – aurangabad

शहरातील विविध समस्यांसंबंधी तक्रार करण्यासाठी महापालिकेने (Municipality) नागरिकांना समाधान हेल्पलाइन (Helpline) उपलब्ध करून दिली आहे. या हेल्पलाइनवर सुरू झाल्यापासूनच तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडत आहे. नऊ दिवसातच तब्बल ७५५ तक्रारी प्राप्त झालया आहेत. यापैकी ४०७ तक्रारी वेळेत सोडवल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. विशेष म्हणजे सर्वात जास्त तक्रारी या प्राणीसंग्रहालयासंबंधी आलेल्या आहेत.

- Advertisement -

सरकारी काम, सहा महिने थांब, याप्रमाणे औरंगाबाद पालिकेची आजपर्यंत स्थिती होती. एखादी किरकोळ समस्या सोडवण्यासाठी देखील नागरिकांना विविध विभागासंदर्भात तक्रारींसाठी नागरिकांना प्रभाग कार्यालय किंवा थेट पालिका मुख्यालयात आजवर चकरा माराव्या लागत. बारंबार तक्रारी करून देखील अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जाते. त्यामुळे पालिका प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पालिका व औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना विशेष हेल्पलाइन सुरू करण्यासंदर्भात आदेश दिले होते. त्यानुसार दीड महिन्यात समाधान हेल्पलाइन तयार केली. मागील आठवड्यात ६ ऑक्टोबर रोजी पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते या हेल्पलाइचे लोकार्पण झाले. यासंदर्भात उपायुक्त संतोष टेंगळे यांनी सांगितले की, १४ ऑक्टोबरपर्यंत या हेल्पलाईनव्दारे तब्बल ७५५ तक्रारी प्राप्त झाल्या. पैकी वेळेच्या आत ४०७ तक्रारी सोडवल्या आहे. त्याची टक्केवारी ५४ एवढी असल्याचे त्यांनी नमद केले.

१०८ तक्रारींवर अजून कार्यवाही

१०८ तक्रारी सोडवण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. तसेच १३ तक्रारी या पालिकेच्या बजेटमध्ये तरतूट करून सोडवाव्या लागणार आहेत. त्यामुळे त्या सध्या सोडवणे शक्‍य नाही. तर ६३ तक्रारी या अवघ्या दोन दिवसांत सोडवल्या, पालिकेच्या इतर अँपव्दारे ७४ तक्रारी आलेल्या आहेत, या तक्रारींचा समावेश ७५५ तक्रारीमध्ये असल्याचे उपायुक्‍त टेगळे यांनी स्पष्ट केले.

आलेल्या तक्रारी
प्राणिसंग्रहालय- ९७
कर आकारणी- ७६
पाणी पुरवठा- ४०

- Advertisment -

ताज्या बातम्या