'ॲडव्हानटेज महाराष्ट्र एक्स्पो'च्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री येणार-केंद्रीय राज्यमंत्री डॉ.कराड

'ॲडव्हानटेज महाराष्ट्र एक्स्पो'च्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री येणार-केंद्रीय राज्यमंत्री डॉ.कराड

औरंगाबाद - aurangabad

मसिआ, ऑरिक आणि डीएमआयसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जानेवारी २०२३ मध्ये होणाऱ्या 'ॲडव्हानटेज महाराष्ट्र एक्स्पो'च्या (Maharashtra Expo) उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी दिले.

यावेळी पालकमंत्री संदिपान भुमरे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाठ तसेच मसिआचे अध्यक्ष किरण जगताप तसेच राहुल मोगले उपस्थित होते.

मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चर (मसिआ) संघटना दर तीन वर्षानी 'ॲडव्हानटेज महाराष्ट्र एक्सपो’ हे औद्योगिक प्रदर्शन भरवते. यावेळी हे प्रदर्शन येत्या ५ ते ८ जानेवारी २०२३ दरम्यान AURIC (DMIC) शेंद्रा येथे आयोजित केले आहे.

'ॲडव्हानटेज महाराष्ट्र एक्सपो २३ ’ हे औद्योगिक प्रदर्शन एकूण २५ एकर एवढ्या जागेवर विस्तारलेले आहे. प्रदर्शनाची दोन मोठ्या हॉलमध्ये विभागणी केली असून यामध्ये इंजिनीअरिंग, ऑटोमोबाइल, ट्रेडिंग, एनर्जी इलेक्ट्रिकल, इन्फ्रास्ट्रक्चर , अग्रो आणि फूड , शैक्षणिक संस्था, बँकिंग, प्लॅस्टिक आणि पॅकेजिंग असे विविध विभागात एकूण ५०० व पगोडा पद्धतीचे १५० असे एकूण ६५० स्टॉल असणार आहेत. याव्यतिरिक्त २००० आसन क्षमतेचे वातानुकूलित मुख्य सभागृह, उद्योजकांना पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे सादरीकरण इत्यादिसाठी १०० आसन क्षमतेचे छोटेखानी स्वतंत्र वातानुकूलित सभागृह, तसेच १०० आसन क्षमतेचे B2B साठी वेगळे सभागृह असणार आहे. प्रदर्शकांच्या आणि अभ्यागतांच्या सोईसाठी दोन मोठे उपहारगृह असणार आहे. त्याचबरोबर अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा वैद्यकीय कक्षाची देखील स्वतंत्रपणे उभारणी करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com