मुख्यमंत्र्यांच्या सभेला १५ अटीशर्ती

८ जून रोजी औरंगाबादेत सभा
मुख्यमंत्र्यांच्या सभेला १५ अटीशर्ती

औरंगाबाद - aurangabad

मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या (Marathwada Sanskritik Mandal) मैदानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची येत्या बुधवारी जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेला शहर (police) पोलिसांनी १५ अटीशर्तीसह परवानगी दिली. त्यासाठी जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे (mla Ambadas Danve) यांनी महिनाभरापूर्वीच अर्ज केला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बीकेसी मैदानावर विराट सभा घेतली, त्याचवेळी औरंगाबादेत ८ जून रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरच सभा घेण्याची घोषणा केली. पोलिसांकडून परवानगी मिळावी, यासाठी आ. दानवे यांनी २ मे रोजी अर्ज केला होता. मुख्यमंत्र्यांच्या सभेला कोणते नियम लावले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राज ठाकरे यांच्या सभेला परवागनी देताना मोठ्या प्रमाणात अटी घालण्यात आल्या होत्या. या अटींचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत राज ठाकरे यांच्यासह इतरांवर सभेनंतर गुन्हा नोंदवला. राज यांच्या सभेला घातलेल्या १५ अटी मुख्यमंत्र्यांच्या सभेलाही लागू आहेत.

«सभेसाठी इतर विभागाचे परवाने घेत सिटी चोक ठाण्यात सभेपूर्वी सादर करावेत.

* सभा दिलेल्या वेळेतच पूर्ण करावी, वेळेत बदल करू नये,

* समेचा वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, याची दक्षता घ्यावी.

«समेत स्वयंशिस्त पाळावी, हुल्लडबाजी होणार नाही, याची दक्षता घ्यावी,

« मुख्यमंत्र्यांच्या येण्याच्या-जाण्याच्या मार्गात बदल करू नये तसेच रॅली काढू नये.

कार्यक्रमात शस्त्र, तलवार बाळगू नये.

* समेला येणार्‍या नागरिकांचा मार्ग, अंदाजे संख्या सभेपूर्वी एक दिवस अगोदर कळवावी.

* सभेसाठी मर्यादेपेक्षा अधिक लोकांना बोलावू नये.

«समेत मजबूत बॅरिकेटस्‌ उभारावेत.

* ५७ डेसिबलपेक्षा अधिक आवाज असू नये.

* अत्यावश्यक सुविधांना बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.

* वीज यंत्रणेत बिघाड झाल्यास जनरेटरची सुविधा असावी.

प्रथमोपचारासाठी अँब्युलन्स असावी.

* पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करावे.

* नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com