सभेला अतिविराट स्वरूप देण्यासाठी शिवसेना मैदानात!

जवळपास पंधराशे बैठकांचे नियोजन 
सभेला अतिविराट स्वरूप देण्यासाठी शिवसेना मैदानात!

औरंगाबाद - aurangabad

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे विशेष प्रेम राहिलेल्या औरंगाबादमध्ये येत्या ८ जून रोजी होणारी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची सभा विराटच नव्हे तर अतिविराट होणार आहे. या सभेविषयीची माहिती शिवसैनिकांसह शिवसेनेवर (Shiv Sena) प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना औरंगाबादने काटेकोर असे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये सभेसाठी निमंत्रण दिले जात असून शहरातही दमदार बैठका घेतल्या जात आहे.

मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर औरंगाबाद शहरात उद्धव ठाकरे यांची पहिलीच जाहीर सभा होत आहे. बाळासाहेबांचे प्रेम असलेल्या या शहराचा कायापालट झाला असून आणखी कितीतरी विकासकामे प्रगतीपथावर आहेत. सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणकोणत्या विषयांवर आपले प्रखर मत मांडतात याकडे अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या अतिविराट सभेचे नियोजन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात केले जात आहे. विशेष म्हणजे या नियोजनात विविध समित्या स्थापन करून जबाबदारी समजावून सांगितली जात आहे.

केवळ एवढेच नाही तर गाव आणि वार्डनिहाय बैठकांबरोबरच शिवसेनेच्या अंगीकृत संघटनांच्या बैठकाही घेतल्या जात असून कामगार सेना, वाहतूक सेना, अल्पसंख्याक व दलित आघाडी, महिला आघाडी तसेच अन्य संघटनांच्या बैठकाही घेतल्या जात आहेत. यामध्ये केवळ शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्तेच नव्हे तर सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.

या बैठकांना उपस्थित राहण्याचे आवाहन उपजिल्हाप्रमुख- संतोष जेजुरकर, अनिल पोलकर, जयवंत (बंडू) ओक, विनायक (गणू) पांडे, आनंद तांदुळवाडीकर, राजेंद्र राठोड, बप्पा दळवी, शहरप्रमुख- बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, बाबासाहेब डांगे, विधानसभा संघटक - राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी, सुशील खेडकर, महिला आघाडी- प्रतिभाताई जगताप, सुनिताताई आऊलवार, सुनिताताई देव, कला ओझा, नलिनीताई बाहेती, अंजलीताई मांडवकर, अनिताताई मंत्री, मीनाताई फसाटे, जयश्रीताई लुंगारे, दुर्गाताई भाटी, प्राजक्ता राजपुत, आशाताई दातार, विद्याताई अग्निहोत्री, भागुताई अक्का, नलिनीताई महाजन, लक्ष्मीताई नरहिरे, मीराताई देशपांडे, युवा सेना- राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे, हनुमान शिंदे यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com