Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedमुख्यमंत्री म्हणतात : सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा सरकार पूर्ण करणार

मुख्यमंत्री म्हणतात : सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा सरकार पूर्ण करणार

औरंगाबाद Aurangabad

राज्यातील सरकार (Government in the state) सर्वसामान्य (common people) जनतेचे असून त्यांच्या अपेक्षा पूर्ण (Fulfilling expectations) करण्याचे काम या सरकारकडून निष्ठेने (Loyalty from the government) केले जाईल, अशी ग्वाही (Guwahi) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आपेगाव (ता.पैठण) येथे दिली. श्री संत ज्ञानेश्वर माऊली (Shri Sant Dnyaneshwar Mauli) यांची जन्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र आपेगाव (Shri Kshetra Apegaon) येथील माऊलींच्या मंदिरात जाऊन मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

- Advertisement -

श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मभूमीच्या दर्शनाने आपण भारावलो असून सर्वसामान्यांची सेवा करण्याची शक्ती माऊली निश्चितपणे देतील, अशी भावनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. दर्शनानंतर विश्वस्त मंडळातर्फे मुख्यमंत्र्यांचा शाल, श्रीफळ, श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर विष्णू महाराज कोल्हापूरकर, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना आदी उपस्थित होते.

संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पैठण येथील श्रीक्षेत्र एकनाथ महाराज मंदिरास भेट देऊन श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर विश्वस्त मंडळाच्यावतीने शाल,श्रीफळ, एकनाथ महाराजांची मूर्ती आणि ग्रंथ देऊन मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी नाथ वंशज हरी पंडित गोसावी, मिलिंद बुवा गोसावी, रघुनाथ बुवा गोसावी पालखीवाले, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री संजय राठोड, कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे, विश्वस्त चनगटे महाराज, गणेश मोहिते आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या