Monday, April 29, 2024
HomeUncategorizedजिल्ह्यातील प्रेमी युगुलाने घेतली रेल्वेसमोर उडी

जिल्ह्यातील प्रेमी युगुलाने घेतली रेल्वेसमोर उडी

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

कुटुंबीयांनी बळजबरीने लग्न लावून दिलेल्या मुलीने अखेर प्रेमासाठी पतीचे घर सोडले. समाजात बदनाम होण्याच्या भीतीने कुटुंबीयांनी दोघांनाही विरोध केला. यामुळे दोघांनी धावत्या रेल्वेसमोर उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात प्रियकर जागीच ठार झाला, तर प्रेयसी गंभीर जखमी झाली. ही घटना रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास एकनाथनगर रेल्वे फाटकाजवळ घडली.

- Advertisement -

Breaking News गुराख्यासह दहा जनावराचा रेल्वेखाली मृत्यू

उमेश मोहन तारू (वय २३,रा. चांगदेव, ता.मुक्ताईनगर जि.जळगाव) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर १९ वर्षीय विवाहीत तरूणी रा. कुंड ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव) ही जबर जखमी असून तिच्यावर खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. उमेश तारू व राणी (नाव बदललेले) हे दोघे ऐकमेकांचे नातेवाईक आहेत. उमेश हा मुक्ताईनगरमध्ये बीएससीचे शिक्षण घेत होता. त्याचे वडील शासकीय कर्मचारी आहे. हे दोघं नातेवाईक असल्याने दोघांचे प्रेमसंबध जुळले. दोघांनी सोबत जगण्याचा निर्धार केला. मात्र ही बाब दोघांच्या कुटुंबीयांना माहिती नव्हती. दरम्यान, २८ फेब्रुवारीला या तरूणीचा विवाह मध्य प्रदेशातील नातेवाईकांशी जे की सध्या ठाणे येथे राहते. त्या कुटुंबातील तरुणासोबत लावला. त्यामुळे उमेश आणि पूजाची ताटातूट झाली. मात्र, तरी देखील दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. लप्नानंतर पुजा ही दहा ते बारा दिवस तिच्या आई-वडिलांच्या घरीच होती.

बेपत्ता तरुणाचा आढळला मृतदेह

सदर तरूणी तिच्या पतीच्या घरी गेल्यानंतर उमेश हा तिला भेटण्यासाठी ठाण्याला गेला. त्यानंतर उमेश व त्याची प्रेयसी तेथून छत्रपत्री संभाजीनगरला आले. कुटुंबीयांना ही बाब माहिती होताच त्यांनी दोघांना फोनवर कडाडून विरोध केला. त्यांनतर दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेत रेल्वेसमोर उडी मारली. या घटनेत उमेश जागीच ठार झाला, तर तरूणी गंभीर जखमी झाली. ही बाब गेटजवळ थांबलेल्या नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच ११२ या नंबरवरून पोलिसांना कळवले. पोलिसांनी दोघांनाही घाटी रुग्णालात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी उमेशला तपासून मयत घोषित केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या