Friday, April 26, 2024
HomeUncategorizedपतीचे अनैतिक संबंध ; पत्नीची आत्महत्या

पतीचे अनैतिक संबंध ; पत्नीची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

माझे दुसर्‍या मुलीवर प्रेम आहे. त्यामुळे तू स्वतः मर नाहीतर तुला मी मारून टाकतो, अशी धमकी पतीने पत्नीला दिली. नंतर तिला त्याने मारहाण देखील केली. पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने अखेर आत्महत्या केली. हा संतापजनक प्रकार १३ मे रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जयभवानीनगर येथे उघडकीस आला. शुभांगी विनोद काळे (२६) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

- Advertisement -

आता सर्वांना मिळणार ‘आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड’

शुभांगी एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून कामाला होती. तिला दोन वर्षांची मुलगी देखील आहे. तिच्या आत्महत्येप्रकरणी पती विनोद विश्वनाथ काळे, दीर विजय काळे, नर्मदा विजय काळे, सासरे विश्वनाथ काळे व सासू सुमनबाई काळे यांच्याविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कौशल्याबाई राजेंद्र खंमाट (४२, नारेगाव, मुळ रा. उमरावती ता. फुलंब्री) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी शुभांगी ही पती विनोद काळे आणि मुलगी माहेश्वरी (दोन वर्ष) हिचे सोबत जयभवानीनगर गल्ली नं. १९ येथे किरायाने राहत होती. शुभांगीचे नसिंगचे शिक्षण झालेले असल्यामुळे एका खासगी रुग्णालयात नोकरी करत. शुभांगीचा विवाह ५ मे २०१५ रोजी विश्वनाथ काळे (रा. वालसा ता. भोकरदन) याचा मुलगा विनोद सोबत झाला. लग्नात संसार उपयोगी सर्व साहित्य भांडी व दागिने असे सर्व दिले. लग्नानंतर शुभांगी तिच्या पतीसोबत जयभवानीनगर येथे राहण्यास गेली. सुरुवातीला सासरकडील मंडळींनी काही महिने चांगली वागणूक दिली.

काही दिवसांनी शुभांगीचे पती रात्री-अपरात्री तासंतास कोणाशी तरी फोनवर बोलत असल्याने शुभांगीने पतीला तुम्ही नेहमी कोणासोबत बोलत असता? तुमच्या मोबाईलमध्ये किती नंबर आहेत? याबद्दल विचारणा केली. तेव्हापासून शुभांगी व विनोदमध्ये वाद विवाद सुरू झाले. शुभांगीला पती मारहाण करून त्रास देऊ लागला. ही बाब शुभांगीने तिच्या आईला बर्‍याचदा सांगितली. मात्र, काही दिवसांत सर्व ठिक होईल, तू तुझ्या नोकरीकडे लक्ष दे, असे म्हणून तिच्या आईने समजूत काढली. त्यानंतर खंमाट कुटुंबीयांनी जावई विनोद याची अनेकदा समजूत काढली. पण काहीच फरक पडला नाही. यामुळे शुभांगी नैराश्यात गेली होती. शिवाय सासरकडील सर्वांनी शुभांगीलाच दोषी ठरवून घरासमोर गल्लीत शिविगाळ केली होती. १० मे २०२३ रोजी शुभांगीला पतीने याच कारणामुळे मारहाण देखील केली.

आत्महत्येपूर्वी शुभांगीने १३ मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास वडिलांना फोन केला. तेव्हा वडिलांना देखील तिचा आवाज ऐकून ती अतिशय नैराश्यात असल्याचे जाणवले. शुभांगीने वडिलांना त्यांची खुषाली विचारली आणि तिने लगेच फोन ठेवून दिला. त्यानंतर तिने सकाळी अकराच्या सुमारास घरातील हॉलमधील सिलींग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या