Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedपत्नी आणि मुलीची हत्या करून स्वतः केली आत्महत्या

पत्नी आणि मुलीची हत्या करून स्वतः केली आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

घरगुती वादातून चिडलेल्या तरुणाने आधी पत्नी व नंतर चार वर्षीय चिमुरड्या मुलीचा गळा आवळून खून करत स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार संभाजीनगरात घडला.  

- Advertisement -

सातारा परिसरातील वळदगाव येथे एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आज सकाळी हा प्रकार समोर आला. मृतांमध्ये पती-पत्नी आणि चार वर्षीय मुलीचा समावेश आहे. मोहन प्रताप डांगर (२८), पूजा मोहन डांगर (२४) आणि श्रेया (४) अशी मृतांची नावे असून पोलिसांना त्यांच्या घरात तीन पानांची सुसाईड नोट सापडली आहे. नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून घातपात असल्याच्या संशय व्यक्त केला आहे.

मोहन आणि त्याचा भाऊ हे मुळचे वळदगावचे असून त्यांना दोन एकर शेती आहे. मात्र मोहनने लग्न केल्यापासून त्याचा भाऊ संतोष यांच्यात किरकोळ कारणावरून वाद होत होते. त्यामुळे मोहन हा घर सोडून वळदगाव येथे उपसरपंच संजय झळके यांच्याकडे डांगर कुटुंब भाड्याच्या खोलीत राहत होते. मोहन डांगर, पूजा मोहन डांगर यांनी काल रात्री लग्नाचा वाढदिवस होता तो मुलीसोबत साजरा केला. त्यानंतर मध्यरात्री मोहनने घरगुती कारणावरून रागाच्या भरात प्रथम पूजाचा दोरीने गळा आवळून तिचे जीवन संपवले. त्यानंतर श्रेया हिला गळफाळ देऊन लटकवले त्यानंतर त्याने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, मोहनने अख्खे कुटुंब संपविण्याचे कारण त्यांच्या घरात मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये दडलेले आहे. याप्रकरणी सातारा पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद होत आहे.

दरम्यान, मयताच्या नातेवाईकांना घटनेची माहिती कळविण्यात आली असून ते आल्यानंतरच नेमका काय वाद होता हे समोर येईल, असे पोलीस निरीक्षक प्रशांत पोद्दार यांनी सांगितले. घरगुती वादातून पती-पत्नीने आधी मुलीला गळफास देऊन नंतर स्वतः आत्महत्या केल्याची प्राथमिक अंदाज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या