स्ट्रीट फूडची गुणवत्ता तपासा

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
स्ट्रीट फूडची गुणवत्ता तपासा

औरंगाबाद - aurangabad

औरंगाबाद जिल्हा पर्यटनाची (Tourism) राजधानी असल्याने येथे येणाऱ्या पर्यंटकांना स्वच्छ व सुरक्षित अन्न देण्याची जबाबबदारी अन्न औषध प्रशासनाची (Food and Drug Administration) असल्याने ही जबाबदारी चोखपणे पार पडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात 'ॲडव्हायझरी कमिटी फॉर सेफ फूड अँड हेल्दी डाएट' या विषयाच्या अनुषंगाने पार पडलेल्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते.

अन्न औषध प्रशासनाने शहरात पुरवठा होणाऱ्या दुधाची शुद्धता तपासणी करावी, अन्न प्रक्रिया व निर्मिती उद्योगात काम करणाऱ्या कामगारांची वैद्यकीय तपासणी करावी, दोन वेळे पेक्षा जास्त वेळा पदार्थ तळण्यासाठी तेल वापरणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी दिले.

रस्त्यालगत असलेल्या (फुडस्टॉल) भेळपूरी, पाणीपुरी, वडापाव, कचोरी, दाबेली, पोहे, इडली वडा-सांबर, डोसा, चायनिज तसेच इतर खाद्यपदार्थाची गुणवत्ता तपासणी करण्याचे निर्देश ही चव्हाण यांनी दिले. सदर बैठकीस अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अजित मैत्रे तसेच अन्न सुरक्षा अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com