Friday, April 26, 2024
HomeUncategorizedमालकाच्या नावे मेसेज करत साडेनऊ लाखाची फसवणूक

मालकाच्या नावे मेसेज करत साडेनऊ लाखाची फसवणूक

औरंगाबाद – aurangabad

मला तत्काळ १० लाखांची गरज आहे, असा मेसेज नावाने त्यांच्याच (Company) कंपनीतील अधिकाऱ्याला मिळाला. मेसेज (Message) पाठवलेल्या नंबरवरील (WhatsApp) व्हॉट्सअपवर डीपी देखील उद्योजकाचा असल्याने अधिकाऱ्याने विश्वास ठेवून ९ लाख ७० हजार तात्काळ पाठवले. मात्र, थोड्या वेळाने उद्योजकाने मी असा कुठलाच मेसेज केला नसल्याचे सांगताच अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात अनोळखी (Mobile) मोबाइलधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

विलास तनपुरे (५५) हे रेल्वेस्थानक रोडवरील उद्योजक राघवेंद्र जोशी यांच्या आर. जे. फीड्स कंपनीत २५ वर्षांपासून काम करतात. ३ मे रोजी त्यांना जोशी यांचा डीपी असलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर अनोळखी क्रमांकावरून मेसेज प्राप्त झाला. मी राघवेंद्र जोशी, मी एका अर्जंट मीटिंगमध्ये आहे. त्यामुळे तुमच्याशी फोनवर बोलू शकत नाही. मला १० लाख रुपयांची अत्यंत गरज आहे. ते तुम्ही तत्काळ बँक खात्यावर पाठवा, असे सांगत बँक खाते क्रमांक व घनश्याम गोंड असे नाव दिले. त्याची खात्री करण्यासाठी तनपुरे यांनी जोशी यांना कॉल देखील केला. मात्र, त्यांनी कॉलला प्रतिसाद दिला नाही.

व्हॉट्सअपवर डीपी देखील जोशी यांचाच असल्याने विश्वास तनपुरे यांनी कार्यालयातील केदार कुलकर्णी यांना त्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. त्याच्या काही वेळाने उद्याेजक जोशी यांच्याशी तनपुरे यांचा संपर्क झाला. तेव्हा जोशी यांनी मात्र तसा कुठलाच मेसेज केला नसल्याचे सांगितले आणि सर्वांनाच धक्का बसला. फसगत झाल्याचे लक्षात आल्यावर तनपुरे यांनी तातडीने पाेलिसांत तक्रार दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या