Tuesday, May 14, 2024
HomeUncategorizedआज मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

आज मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

औरंगाबाद – Aurangabad

काल रात्री जोरदार पावसाने सर्वत्र दाणादाण उडवल्यावर देखील तापमानात सरासरीच्या तुलनेत 2 अंशांनी वाढ होऊन कमाल तापमान 33 तर किमान 22 अंश नोंदले गेले. आज 5 सप्टेंबरला औरंगाबादसह मराठवाड्यात (Marathwada , Aurangabad) वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मंगळवारपासून मुसळधार हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे काढणीस आलेली पिके भिजणार नाहीत याची दक्षता घ्यावी. असे आवाहन हवामान विभागाने दिले आहे. 6 सप्टेंबरला जालना, परभणी, नांदेड, हिंगोली व लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी तर 7 सप्टेंबर दरम्यान औरंगाबाद, कन्नड, खुलताबाद, फुलंब्री, सिल्लोड, वैजापूर (Aurangabad, Kannada, Khultabad, Fulambri, Sillod, Vaijapur) तालुक्यासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जेथे पोषक वातावरण तयार होईल तेथे वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह अतिवृष्टी होऊ शकते.

- Advertisment -

ताज्या बातम्या