सावधान... आणखी एका चक्रीवादळाची शक्यता 

सावधान... आणखी एका चक्रीवादळाची शक्यता 

चार दिवस अतिमुसळधार पाऊस

औरंगाबाद - aurangabad

येणारे चार दिवस राज्यात (Vidarbha) विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज (Andaman Nicobar) अंदमान आणि निकोबारमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपले आहे. पुण्यासह ठाणे आणि घाट परिसरात तर ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. त्याचबरोबर कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटकातील किनारपट्टी भाग, केरळ आणि पुद्दुचेरी येथील माहे येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे.

या सर्व भागात ९ ऑक्टोबरला देखील मुसळधार पाऊस पडू शकतो. महाराष्ट्र राज्याव्यतिरिक्त, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्येही १० ऑक्टोबर रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुन्हा चक्रीवादळाचा धोका

भारताला यावर्षी यास, तोतै, गुलाब अशा चक्रीवादळाचा अधिकच फटका बसला आहे. याचा राज्याला मोठा फटका बसला आहे. आता पुन्हा एकदा आणखी एक चक्रीवादळ येण्याचा धोका संभवतो आहे. याबाबतची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.

१० ऑक्टोबरला अंदमानजवळ एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून त्यानंतर ओडिसा आणि उत्तर आंध्र प्रदेशकडे ते सरकेल असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याबाबत अद्याप माहिती देण्यात आली नाही. मात्र मागे आलेली चक्रीवादळ अशाच कमी दाबाच्या क्षेत्रातून निर्माण झाली आहेत. आताही असेच चक्रीवादळ निर्मण होण्याची भीती काही हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.