Sunday, April 28, 2024
HomeUncategorizedऑरिकमध्ये गुंतवणूकीसाठी 'एथर एनर्जी' तयार ; लवकरच होणार घोषणा

ऑरिकमध्ये गुंतवणूकीसाठी ‘एथर एनर्जी’ तयार ; लवकरच होणार घोषणा

औरंगाबाद – aurangabad

शहरात मोठी गुंतवणूक यावी यासाठी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अण्ड अग्रीकल्चर सीएमआयए (Chamber of Marathwada Industries and Agriculture CMIA) संस्थेने पुढाकार घेतला असून मुंबई (mumbi) येथे उद्योग प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आणि उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंघ कुशवाह यांच्यासोबत एथर एनर्जी आणि एड्रेसहौजर प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली. मोठी गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल असलेल्या या कंपन्यांनी सविस्तर बोलणी करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

एथर एनर्जी ही इलेक्ट्रिक दुचाकी निर्मिती करणाऱ्या भारतातील अग्रेसर कंपनीने ऑरिकमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली असून या मोठ्या गुंतवणूकीच्या अनुषंगाने त्यांना अनुदान आणि प्रोत्साहनसाठी शासनाचे सहकार्य करावे, तसेचएंड्रेज हौजर आपला चीनमधील प्रकल्प भारतात आणू इच्छित आहे. या कंपनीचे प्रकल्प औरंगाबादेत येत असून चीनमधून प्रकल्प भारतात आल्यास येथे गुंतवणूक करण्याबाबत कंपनी सकारात्मक आहे.

मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये सीएमआयणएने या गुंतवणुकीसाठी कसे चांगले हे पटवून देताना; या विभागातील इको सिस्टीमबद्दल सविस्तरपणे सादरीकरण केले. एथर एनर्जी कंपनीच्या प्रतिनिधींनी येथील कुशल मनुष्यबळ आणि कंपनीसाठी हवे असलेले पोषक वातावरण याबाबत विचारणा केली, सीएमआयपएच्या स्ट्राईन्ह आणि ऑटो क्लस्टर प्रकल्पाच्या माध्यमातून येथे कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात असल्याची माहिती त्यांना शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आली.

या बैठकीला अर्पित सावे, मानद सचिव, सीएमआयए, उत्सव माछर, कोषाध्यक्ष सीएमआयए, अथर्वेश नंदावत, संयुक्त कोषाध्यक्ष, सीएमआयए, डॉ. उल्हास गवळी, माजी अध्यक्ष, सीएमआयए आणि प्रख्यात उद्योजक गौतम नंदावत, माजी अध्यक्ष, सीएमआयए, अथर एनर्जीतर्फे संचालक मुरली शशिधरन, श्रीकांत विश्वेधरन, संजीव कुमार सिंग, के कुमार, अध्यक्ष आणि संचालक, स्मिता भारतीया यांची प्रमुख उपस्थिती होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या