सणासुदीत दिलासा; खाद्यतेल होणार स्वस्त

सणासुदीत दिलासा; खाद्यतेल होणार स्वस्त

नवी दिल्ली | प्रतिनिधी New Delhi

सण उत्सव सुरु झाले आहेत. या सणासुदीच्या काळात महागाई गगनाला भिडलेली असताना आता गृहिणींसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.गेल्या अनेक दिवसांपासून गगनाला भिडलेले खाद्य तेलाचे भाव काहीसे कमी होणार आहेत....

केंद्र सरकारने सर्व सामान्यांना दिलासा देण्यासाठी पाम आणि सुर्यफूल तेलावरील कृषी उपकर (Agri Cess)आणि सीमा शुल्कात (Custom Duty) कपात केली आहे. याआधी उपभोक्ता मंत्रालयाने तेल आणि तिलहनवर साठ्याच्या मर्यादेचा आदेश जारी केला होता.

साठ्याची मर्यादा 31 मार्च 2022 पर्यंत लागू असणार आहे. राज्यांना आदेशाचे सक्तीने पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सरकारच्या निर्णयानंतर खाद्य तेल किमान १५ रुपये प्रतिलिटर स्वस्त होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डकडून (Custom duty) देण्यात आलेल्या सूचनेनुसार शुल्कात कपात 14 ऑक्टोबरपासून केली जाईल. हि कपात 31 मार्च 2022 पर्यंत लागू असेल असे सांगण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.