बकरी ईद साध्‍या पध्‍दतीने साजरी करा

मार्गदर्शक सूचना जारी
बकरी ईद साध्‍या पध्‍दतीने साजरी करा

औरंगाबाद-Aurangabad

कोविड -19 मुळे उद्भवलेल्‍या संसर्गजन्‍य परिस्थितीचा विचार करता या वर्षीची बकरी ईद 2021 साध्‍या पध्‍दतीने साजरा करण्‍याच्‍या अनुषंगाने शासनस्तरावरुन मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्‍यात आलेल्‍या आहेत. तसेच कोविड-19 संसर्गाची दुसरी लाट आटोक्‍यात येत असतानाच केंद्रीय कृती गटाने कोविड-19 ची तिसरी लाट येत्‍या काही दिवसांत येण्‍याची शक्‍यता वर्तविली आहे. त्यादृष्टीने दिनांक 21 जूलै 2021 रोजी साजरा होणा-या बकरी ईद-2021 (चंद्र दर्शनावर अवलंबून ) बाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्‍यात आलेल्‍या आहेत.

औरंगाबाद जिल्‍हयातील सर्व जनतेला बकरी ईद-2021 साजरा करण्‍याबाबत काय करावे आणि काय करु नये याबाबत खालीलप्रमाणे सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुनील चव्हाण यांच्याव्दारे निर्गमित करण्‍यात आल्या आहेत. तसेच शासनाकडून लागू करण्‍यात आलेले Level of Restrictions for Breaking the Chain बाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्‍या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्‍यामध्‍ये बकरी ईद निमित्‍त कोणतीही शिथिलता देता येणार नाही.

काय करु नये-

कोविड-19 या विषाणुचा प्रादुर्भावाच्‍या अनुषंगाने कोणत्‍याही प्रकारे शासनाने विहीत केलेल्‍या मार्गदर्शक सूचना व नियमांचे उल्‍लंघन करण्‍यात येऊ नये.

बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा करु नये.

बकरी ईदच्‍या निमित्‍ताने नागरिकांनी कुठल्‍याही सार्वजनिक ठिकाणी जनावरे खरेदीसाठी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.

नागरिकांनी शक्‍यतो प्रतिकात्‍मक कुर्बानी करताना गर्दी करु नये व सोशल डिस्‍टन्सिंगच्‍या नियमांचा भंग करु नये.

रात्रीची संचारबंदी असल्‍यामुळे संचारबंदीच्‍या काळात नागरिकांनी विनाकारण रस्‍त्‍यावर फिरु नये.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com