औरंगाबादवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची 'नजर'

स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनचा उपक्रम 
औरंगाबादवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची 'नजर'

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (Smart City Development Corporation) माध्यमातून शहर सुरक्षेच्या दृष्टीने राबवण्यात आलेल्या मास्टर सिस्टीम इंटिग्रेडर (एमएसआय) प्रकल्पांतर्गत शहरात सातशे सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV cameras) बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील प्रमुख चौक आणि प्रमुख रस्त्यांवर चोवीस तास नजर ठेवली जात आहे. कायदा-सुव्यवस्था (Law and order) राखण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे.

औरंगाबादवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची 'नजर'
डॉ.मनीषा काकडे यांनी मिळविली फेलोशिप

शहर सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला 'एमएसआय प्रकल्प' (MSI Project) स्मार्ट सिटी अभियानात सहभागी झालेल्या सर्वच शहरांना राबवणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने देखील या प्रकल्पाचे काम हाती घेतले. 176 कोटी रुपयांच्या 'एमएसआय' प्रकल्पामध्ये शहराच्या महत्त्वाच्या चौकांत व महत्त्वाच्या रस्त्यांवर 700 सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. त्याशिवाय पोलिस आयुक्तालयात कमांड अँड कंट्रोल सेंटर, महापालिका मुख्यालयात ऑपरेशन कमांड अँड कंट्रोल सेंटर, पोलिस व्हिव्हींग सेंटर, डेटा सेंटर उभारणीच्या कामांचा यात समावेश आहे. ही सर्व कामे पूर्ण झाली असल्याची माहिती 'एमएसआय' प्रकल्पाचे औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे प्रकल्प व्यवस्थापक फैज अली यांनी दिली. यावेळी अलाइड डिजिटल सर्व्हिसेसचे (Allied Digital Services) प्रकल्प व्यवस्थापक आशिष शर्मा, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बोंडेकर उपस्थित होते. त्यांच्या निगराणीखाली पोलीस आयुक्तालयातील कमांड अँड कंट्रोल सेंटरचे काम सुरु आहे. 'स्मार्ट सिटी'च्या अर्पिता शरद देखील या वेळी उपस्थित होत्या.

औरंगाबादवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची 'नजर'
औरंगाबाद जिल्ह्यात 16 रुग्ण आढळले

100 कॅमेरे फिरते

फैजल यांनी दिलेल्या माहितीनुसार एमएसआय प्रकल्पात शहरात सातशे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे उद्दिष्ट होते, ते पूर्ण करण्यात आले आहे. सातशे पैकी सहाशे कॅमेरे फिक्स कॅमेरे असून शंभर कॅमेरे फिरते कॅमेरे आहेत, त्यांना पीटीझेड कॅमेरे असे संबोधले जाते. पोलीस विभागाकडून करण्यात आलेल्या सूचनेनुसार 418 जंक्शनवर हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. कॅमेरे बसवण्यासाठी 418 खांब उभारण्यात आले असून, सुमारे १५० किलोमीटरचे केबल टाकण्यात आले आहे. केबल टाकण्याचे काम बीएसएनएल कंपनीने केले आहे. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील 14 पोलिस स्टेशनमधील बहुतेक सर्व विभाग 'सीसीटीव्ही'ने एकमेकांशी जोडण्यात आले आहेत. 170 चौरस किलोमीटरचा परिसर 'सीसीटीव्ही'च्या टप्प्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com