आता मांजरांचीही होणार नोंदणी

राज्यभरात संभाजीनगर पॅटर्न
आता मांजरांचीही होणार नोंदणी

छत्रपती संभाजीनगर - Chhatrapati Sambhajinagar


शहरात मागील काही वर्षांपासून श्वानांप्रमाणेच मांजरी पाळणार्‍यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. विविध प्रजातींचे विदेशी श्‍वासनांसह मांजरी शहरात आहेत. शहरात पर्शिअन प्रजातीच्या मांजरीला अधिक पसंती आहे. त्यामुळे प्रशासनाने आता श्‍वासांप्रमाणेच मांजरींची नोंदणी (Registration of cats) देखील बंधनकारक केली असून यात प्राण्यांवर औषधोपचार करण्यासाठी मनपाची मोबाईल व्हॅन नागरिकांच्या घरी येईल, त्यासाठी ठराविक शुल्क वसूल केले जाणार आहे.

आता मांजरांचीही होणार नोंदणी
वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावामुळे महिलांमध्ये अधिक अंधश्रद्धा-प्रा.सविता शेट्टे

महानगरपालिकेच्या पशुसंवर्धन विभागाकडून मागील अनेक वर्षांपासून श्‍वान परवाना देण्यात येतो. शहरात सुमारे ७५० पेक्षा अधिक नागरिकांनी महानगरपालिकेकडून श्‍वान परवाने घेतले आहेत. मात्र, एकदा परवाना घेतला की, त्याच्या नूतनीकरणासाठी नागरिक मनपाकडे पुन्हा फिरकत नाही. नूतनीकरण करून घेणार्‍यांची संख्या अतिशय कमी आहे. दरवर्षी परवाना नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. महानगरपालिकेच्या मध्यवर्ती जकात नाका येथील प्राण्यांच्या रुग्णालयात नागरिक पाळीव प्राणी घेऊन येतात. त्यांच्यावर महानगरपालिकेकडून उपचारही केले जातात. प्राण्यांना रेबीज सह अन्य इंजेक्शन द्यावे लागतात. बहुतांश नागरिक आपल्या घरातील सदस्याप्रमाणे पाळीव प्राण्यांना जीव लावतात. त्यांना किंचितही त्रास होऊ लागला तर खासगी डॉक्टर, मनपा रूणालय, खडकेश्‍वर येथील शासकीय दवाखान्यात घेऊन जातात.

शहरात श्‍वानांसह मांजरप्रेमींची संख्या झपाट्याने वाढू लागली. ही वाढती संख्या लक्षात घेता त्यांना विविध सोयी सुविधा देण्याचा विचार मनपाने केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून एक मोबाईल व्हॅन तैनात करण्याचे प्रयत्न आहेत. नागरिकांनी मनपा पशुसंवर्धन विभागाला कॉल केल्यानंतर मोबाईल व्हॅन त्यांच्या दरवाजासमोर येईल. तसेच तुमच्या लाडक्या प्राण्यावर औषधोपचार करून निघून जाईल. या सुविधेसाठी मनपाद्वारे ठराविक शुल्क वसूल केले जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली. त्यामुळे श्‍वानांसह नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या मांजरीची देखील नोंदणी मनपाकडे करणे बंधनकारक केले जाणार आहे.

राज्यातील काही महापालिका घरा-घरांत पाळलेल्या प्रत्येक प्राण्याची नोंद करतात. त्यासंदर्भात परवाना देखील दिला जातो. आता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका  देखील शवानांप्रमाणे मांजरींची नोंदणी करणार आहे. लवकरच यासंदर्भातील तपशील जाहीर करून अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com