Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादच्या खासदाराविरुद्ध गुन्हा दाखल 

औरंगाबादच्या खासदाराविरुद्ध गुन्हा दाखल 

औरंगाबाद – Aurangabad

लॉकडाऊनमध्ये व्यापार्‍यांच्या सील केलेल्या दुकानांवरील कारवाई मागे घेण्याच्या मागणीसाठी गेलेल्या खासदार इम्तियाज जलील यांनी कामगार उपायुक्तांशी अरेरावी केली. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमोर महिला पोलिसाशी गैरवर्तन केले. त्यावरून खा.जलील यांच्यासह 25 जणांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

कर्तव्याचा भाग म्हणून महिला पोलीस चित्रीकरण करत असताना खासदारांनी हाताला धक्का देऊन त्यांचा मोबाइल खाली पाडला. त्यांना देखील उद्धटपणे वागणूक दिली. त्यावरुन कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांनी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शहरातील सील केलेल्या 66 दुकानांबाबत मंगळवारी कामगार उपायुक्त कार्यालयात सुनावणी होती. तेव्हा खासदार इम्तियाज हे 24 दुकानदारांना घेऊन पोळ यांच्या दालनात गेले.

कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांना एकेरी भाषा वापरत अरेरावी केली होती. तसेच दुकानांचे सील न काढल्यास तुम्हाला कार्यालयाबाहेर पडू देणार नाही अशी धमकी देत कामगार उपायुक्त कार्यालयास घेराव घातला होता. याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून खा. जलील यांच्यासह 25 व्यापा-यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या