दर्जेदार शिक्षणानेच आयटीमध्ये करिअरच्या संधी-गणेश राणे

दर्जेदार शिक्षणानेच आयटीमध्ये करिअरच्या संधी-गणेश राणे

औरंगाबाद - aurangabad

इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे (Information Technology) युग दिवसेंदिवस अधिकाधिक स्पर्धात्मक होत आहे. जोपर्यंत तुम्ही त्यासाठी तयार होत नाही तोपर्यंत तुम्हाला अपेक्षित असणारे पॅकेज (Package) मिळणार नाही. केवळ (College) कॉलेजच्या पदवीने तुमची स्वप्नवत नोकरी मिळवू शकणे आजच्या काळात अवघड आहे. जर तुम्ही (IT sector) आयटी क्षेत्रात सर्वोत्तम होण्याचे ध्येय ठेवत असाल तर तुमच्या रेझुमेवर आयटी प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे, असे मत (Technical World Institute) टेक्निकल वर्ल्ड इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक गणेश राणे यांनी व्यक्त केले.

शहरातील कॅनॉट भागातील टेक्निकल वर्ल्ड इन्स्टिट्यूटमध्ये एका कार्यशाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी आयटी क्षेत्राचा वेगाने होत असलेला विस्तार आणि विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने हे क्षेत्र कसे फायदेशीर ठरू शकते यावर सविस्तर मार्गदर्शन केले. आगामी काळ हा कुशल मनुष्यबळाचाच असणार असे आपण सहजपणे बोलतो आणि ऐकतो सुद्धा. त्यामुळेच अद्ययावत तंत्रज्ञानाच्या या युगात स्किल एज्युकेशन ही काळाची गरज बनली आहे. त्यामध्ये प्रात्यक्षिकांद्वारे दिले जाणारे प्रशिक्षण त्या विद्यार्थ्याला अधिक सक्षम बनवते. शिवाय त्याची कार्यक्षमता देखील वाढवते. आजघडीला टेक्निकल वर्ल्ड इन्स्टिट्यूटने आयपी फोर नेटवर्कर्स (बंगळुरू) सोबत एकत्रितपणे औरंगाबादमधील विद्यार्थ्यांच्या हितासाठी विविध कोर्सेस सुरू केले आहेत. रोजगाराभिमुख असे सीसीएनए, सीसीएनपी एनकोर, अमेझॉन एडब्ल्यूएस, एझुर, हार्डवेअर-नेटवर्किंग अशा कोर्सेसच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांना चांगल्या वेतनाचे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी मिळत आहेत.

आजघडीला सगळ्याच क्षेत्रात स्किलला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. विविध खासगी क्षेत्रात तसेच कंपन्यांमध्ये पारंगत तरुणांना मोठी मागणी असते. आपल्याकडील शाळा आणि महाविद्यालयांमधून शिकविले जाणारे अभ्यासक्रम बहुतांश थेअरीवर आधारित आहेत. परंतु, याउलट मार्केटमध्ये प्रॅक्टिकल ज्ञानाला अधिक महत्त्व आहे. सखोल निरीक्षण केल्यास जागतिकीकरणामुळे स्किलप्राप्त तरुणांना जगभर संधी मिळत आहे. नेटवर्किंग क्षेत्रात नेटवर्क ऍडमिन, नेटवर्क इंजिनिअर, क्लाऊड इंजिनिअर, सिस्टीम इंजिनिअर, नेटवर्क आर्किटेक्ट अशा अनेक संधी उपलब्ध आहेत. पुणे-मुंबई, बंगळुरूसारख्या आयटी हब असणाऱ्या शहरात करिअरच्या मोठ्या संधी असून प्रॅक्टिकलवर भर असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाते, असेही गणेश राणे यांनी नमूद केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com