Friday, April 26, 2024
HomeUncategorizedमास्क, सॅनेटायझरला लोकांनी केले 'बाय-बाय'

मास्क, सॅनेटायझरला लोकांनी केले ‘बाय-बाय’

औरंगाबाद – aurangabad

गेल्या दोन-अडीच वर्षापासून जगात सर्वत्र हाहाकार उडवून देणार्‍या (corona) कोरोना महामारीची तिसरी लाट आता ओसरली आहे. कोरोनाची तिसरी लाट ओसरली असल्यामुळे जीवनरक्षक ठरलेल्या (Masks) मास्क आणि सॅनिटायझरची (Sanitizers) विक्री देखील आता थंडावली असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.

- Advertisement -

डिसेंबर २०१९ अखेर भारतात दाखल झालेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाने तितक्याच वेगाने संपूर्ण भारताला आपल्या विळख्यात घेतले होते. त्यामुळे (Prime Minister Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्च २०२० ते सप्टेंबर २०२० या काळात सक्तीचा (Lockdown) लॉकडाऊन केला होता. कोरोनाची लाट वेगाने पसरत असल्याने भारतासह जगभरात हाहाकार उडाला होता. त्यानंतर कोरोना महामारीची लाट ओसरली असतानाच दुसर्‍या लाटेने २०२१ या वर्षात सर्वत्र धुमाकूळ घातला होता. त्यावेळी राज्य सरकारने तीन ते चार महिन्याचा लॉकडाऊन केला होता.

कोरोना महामारीच्या तिसर्‍या लाटेने २०२१ या वर्षाच्या शेवटी पुन्हा एकदा उचल खाल्ली. परंतु, त्यावेळी या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी होती. आजघडीला कोरोना महामारीची तिसरी लाट संपूर्णपणे ओसरली असून येत्या मार्च अखेरपर्यंत राज्य निर्बंधमुक्त करण्याचे सुतोवाच राज्य शासनाने केले आहे.

दरम्यान, कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या वेळी जीवनरक्षक ठरलेले मास्क आणि हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली होती. कोरोना महामारीची तिसरी लाट आता ओसरल्यानंतर अनेकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे पूर्णपणे थांबविले आहे. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझर अडगळीत पडले आहेत. तसेच शासकीय कार्यालयात देखील आता सॅनिटायझरची सक्ती केली जात नसल्यामुळे सॅनिटायझरसाठी उभे केलेले स्टँड अडगळीत पडले असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या