Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedउत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणी विना पडून!

उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणी विना पडून!

औरंगाबाद – aurangabad

दहावी-बारावीच्या (ssc-hsc) उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात कुचराई करणार्‍या शैक्षणिक संस्थांवर (Educational Institution) विभागीय मंडळाकडून कडक कारबाई करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. उत्तरपत्रिका तपासणी न करणाऱ्या दोन (Notice to Institutions) संस्थांना नोटिसा पाठवत मंडळाने खुलासा मागवला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Board of Higher Education) दहावी-बारावीच्या परीक्षा नुकत्याच घेण्यात आल्या. दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल तर बारावी ४ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान झाली. परीक्षेनंतर यंदा उत्तरपत्रिका तपासणीचा प्रश्न जटिल बनला आहे. शैक्षणिक संस्थांच्या कचुराईमुळे राज्यातील मंडळांच्या तुलनेत औरंगाबाद विभागीय मंडळ उत्तरपत्रिका तपासणीत मागे असल्याचे समोर आले आहे.

अनेक महाविद्यालयांमध्ये गठ्ठे तपासणी विना पडून आहेत. ज्या संस्थांमध्ये उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणीविना पडून आहेत, अशा संस्थांवर मंडळ कारवाई करेल, असा इशारा मंडळाने आधीच दिलेला आहे. त्यानुसार कारवाईची प्रक्रिया मंडळ विभागीय कार्यालयातून सुरू झाल्याची माहिती सूजञांनी दिली. उत्तरपञिकांचे गठ्ठे तपासणीविना पडून असलेल्या दोन संस्थांना कारणे दाखवा नोटिसा मंडळाकडून बजावण्यात आल्या आहेत. उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण का झाली नाही?, त्यामुळे मंडळाकडून आपली मान्यता का काढण्यात येऊ नये, अशा प्रकारची विचारणा नोटिसांमध्ये केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या