खूशखबर...मुलांना बुंदीचा लाडू, जामुन, रसाची मेजवानी!

शालेय पोषण आहाराचा उपक्रम
खूशखबर...मुलांना बुंदीचा लाडू, जामुन, रसाची मेजवानी!

औरंगाबाद - aurangabad

शाळेत पहिल्या दिवशी पोषण आहारात (Nutrition diet) मुलांना पोषण आहारात बुंदीचा लाडू, गुलाब जामुन, आंब्याचा रस, शिरा (Bundi laddu, rose berries, mango juice, shira), अशी मिष्टान्न चाखायला मिळणार आहे. त्यामुळे जून महिन्यात शाळा (School) उघडताच मुलांचा पहिला दिवस गोड होणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण (Education Officer Jayashree Chavan) यांनी दिली.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या शाळा बंद होत्या. आता २०२२-२३ या नव्या शैक्षणिक वर्षात १३ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. यासाठी एप्रिलमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने शाळपूर्व तयारी उपक्रमही राबवण्यात आला. आता शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा करताना विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत होणार आहे. शिवाय मुलांना पहिल्याच दिवशी गणवेश, पाठ्यपुस्तके आणि त्यांच्या आवडीचा पोषण आहार मिळणार आहे.

पहिल्या दिवसापासून मुलांना शाळेची गोडी निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या दिवशी विद्यार्थी फक्त खेळ, धम्माल, मस्ती करतील. पोषण आहारात मिष्टान्न देण्यात येणार आहे. कोरोना व इतर कारणांमुळे पालकांचे छत्र हरपलेल्या मुलांचे विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या मार्फत सर्वेक्षण करण्यात आले. यात औरंगाबाद विभागात एकूण १ हजार ४८७ विद्यार्थी आढळून आले होते.

या मुलांसाठी न्यायाल्याच्या आदेशानुसार महिला व बालकल्याण विभागातून बाल न्याय निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा निधी कोरोना काळात पालकत्व गमावलेल्या ३ ते १८ वयोगटातील मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी प्रति बालक दहा हजार रुपये वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे. विभागातील जालना, परभणी, औरंगाबाद, बीड आणि हिंगोली अशा जिल्ह्यातील अनाथ मुलांना शैक्षणिक खर्चासाठी प्रत्येकी दहा हजार दिले जातील.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com