औरंगाबादमध्ये सव्वातीनशे घरांवर 'बुलडोजर'

मोठा पोलीस बंदोबस्त 
औरंगाबादमध्ये सव्वातीनशे घरांवर 'बुलडोजर'
Sandip Tirthpurikar

औरंगाबाद - aurangabad

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील (Labor Colony) लेबर कॉलनी या शासकीय वसाहतीतील ३३८ घरांची अखेर बुधवारी सकाळपासून पाडापाडी सुरू झाली आहे. रहिवासी, राजकीय पक्ष, संघटनांकडून या कारवाईला विरोध होण्याची शक्यता लक्षात घेता (Collector Sunil Chavan) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व पोलिस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता (Commissioner of Police Dr. Nikhil Gupta) यांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

बुधवारी सकाळी ६ ते रात्री नऊ वाजेपर्यंत तब्बल ७५१ अधिकारी, कर्मचाऱ्यांसह तीन दंगा काबू पथके तैनात केली आहेत. पहाटे पाच वाजताच सर्वांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. शहरातील १७ पोलिस ठाण्यांचे प्रभारी त्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह या वेळी हजर होते. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लेबर कॉलनीसंदर्भातला अंतिम निर्णय जाहीर केल्यापासून पोलिस विभागाशी सातत्याने संपर्कात आहेत.

(police) पोलिस विभागाने बंदोबस्त व कायदा व सुव्यवस्थेची संपूर्ण तयारी दाखवली. लेबर कॉलनी परिसरातील शासकीय निवासस्थाने रिकामी करण्याचा निकाल उच्च व सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर तसेच या बिरोधातील सर्व याचिका फेटाळण्यात आल्यानंतर आता संपूर्ण लेबर कॉलनी पाडली जात आहे. तत्पूर्वीच येथील रहिवाशांनी मंगळवारी घरे सोडण्याच्या मुदतीच्या अखेरच्या दिवशी घरातील सामान, पत्रे, भंगार हलविले.

Related Stories

No stories found.