३५० वर्षांपासूनची पावसाचे भाकीत वर्तवणारी परंपरा : अक्षय्य तृतीयेस होणार भेंडवळची मांडणी

३५० वर्षांपासूनची पावसाचे भाकीत वर्तवणारी परंपरा : अक्षय्य तृतीयेस होणार भेंडवळची मांडणी

भाकीत कळेल दुसऱ्या दिवशी

दिपक सुरोसे

शेगाव - Shegaon

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भेंडवळ येथील प्रसिद्ध असलेली भेंडवळची मांडणीला कोरोनामुळे मागील वर्षापासून मोजक्या लोकांमध्येच मांडणी करण्यात येत आहे.

यावर्षी देखील मागील वर्षाप्रमाणे चार व्यक्तीमध्ये मांडणी करणार आहेत व दुसऱ्या दिवशी सकाळी याचे भाकित वर्तवण्यात येणार आहे. चंद्रभान वाघ यांनी साडेतीनशे वर्षापूर्वी या मांडणीला सुरुवात केली होती. यावर्षी ही मांडणी दि.14 मे 2021 रोजी करण्यात येणार असून 15 मे 2021 रोजी या मांडणीचे भाकीत उघडले जाणार आहे.

अशी होते मांडणी

शेताच्या मधोमध दीड बाय दोन फुटाचा खड्डा तयार करण्यात येतो त्यामध्ये चार काळ्या मातीचे ढेकूळ ठेवून त्यावर पाण्याची घागर ठेवण्यात येते घागरीवर कुरडई, करंजी, पुरी, भजा, वडा, पपाड, इत्यादी ठेवण्यात येतात. खडयात खाली पान विडा ठेवण्यात येतो. व खड्याच्या समान अंतरावर केलेल्या जागेत अंबाडी, मूग, उडीद, साळी, जवस, लाख, वटाणा, गहू, हरभरा, करडी, मसूर, हि धान्य थोडे थोडे प्रमाणात ठेवण्यात येते.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजताच्या पुंजाजी महाराज वाघ, चंद्रभान महाराज वाघ, व अन्य दोन व्यक्ती त्यांच्या अनुभवानुसार निरीक्षण करतात व याचे भाकीत सांगण्यात येते.

मागील वर्षाचे असे होते भाकीत

मागील वर्षी कुलदैवतचा कोप सांगितला होता. भादलीचा दाणा (धान्य) हा बाहेर गेला होता ते रोगराईचे प्रतीक आहे. त्यामुळे साथीचा रोग अद्यापही बंद न होता सुरूच आहे तसेच घागरीमघ्ये पाणी अधिक होते त्यामुळे जलाशये धरण कालवे भरलेले राहीले त्यामुळे पाणी टंचाई जाणवणार नाही असे भाकीत सांगण्यात आले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com