आता बांधकाम परवाना मिळणार फक्त 'ऑनलाईन'च!

नगरविकास खात्याचा निर्णय
आता बांधकाम परवाना मिळणार फक्त 'ऑनलाईन'च!

औरंगाबाद - aurangabad

(Home, shop) घर, दुकानांचे बांधकाम (Construction) करू इच्छिणाऱ्यांना आता पुढील केवळ तीन महिनेच ऑफलाईन (Offline) बांधकाम परवानगी मिळू शकणार आहे. तीन महिन्यांच्या काळानंतर बांधकाम परवानगीची प्रक्रिया (Online) ऑनलाईन केली जाईल,' असे हमिपत्र संबंधित महापालिकेला (Municipal Corporation) राज्य सरकारच्या (State Government) नगरविकास विभागाकडे (Urban Development Department) सादर करावे लागणार आहे व तीन महिन्यात ऑनलाईन प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे.

बांधकाम परवानगी घेताना नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे बांधकाम परवानगी ऑनलाइन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. एक ऑक्टोबर २०१९ पासून ऑनलाईन बांधकाम परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू करा, असे आदेश राज्यातील सर्व महापालिकांना देण्यात आले. मात्र, काही महापालिकांनी विविध प्रकारची कारणे पुढे करून ऑनलाईन प्रक्रिया पूर्णपणे सुरू केली नाही. काही महापालिकांमध्ये ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने बांधकाम परवानगी दिली जाते. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत सर्वच महापालिकांनी बांधकाम परवानगीची ऑनलाईन प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश आता राज्याच्या नगरविकास विभागाने दिले आहेत.

तीन महिन्यांपर्यंत महापालिकेच्या यंत्रणेला ऑफलाईन बांधकाम परवानगी देता येईल; पण त्यासाठी तीन महिन्यांत ऑनलाईनची पद्धत तयार केली जाईल, अशी हमी महापालिकांना राज्य सरकारला द्यावी लागणार आहे. याबद्दलचे आदेश नगरविकास विभागाचे अव्वर सचिव किशोर गोखले यांनी दिले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com