Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedजालन्यात इन्कम टॅक्सची माेठी कारवाई ; ४०० कोटींचे घबाड सापडले

जालन्यात इन्कम टॅक्सची माेठी कारवाई ; ४०० कोटींचे घबाड सापडले

औरंगाबाद – aurangabad

जालन्यात (Jalna) प्राप्तीकर विभागाकडून (Income Tax Department) मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्टील कारखानदार (Steel factory), कपडे व्यापारी (merchant) आणि रिअल इस्टेट डेव्हलपर (Real estate developer) यांच्या घरांवर छापा टाकला या छाप्यात तब्बल ३९० कोटींचं घबाड सापडलं आहे. घरं, कार्यालयांवर टाकलेल्या छाप्यातून सापडलेली ही बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये ५८ कोटींची रोख रक्कम तसंच ३२ किलो सोन्याचे दागिने, हिरे असा ऐवज आहे. याशिवाय ३०० कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रं सापडली आहेत. विशेष म्हणजे अधिकारी जवळपास १३ तास ही रोख रक्कम मोजत होते.

- Advertisement -

जालन्यामधील चार स्टील कारखानदारांकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली होती. स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने १ ऑगस्टला या स्टील कारखानदारांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. कारवाईसाठी पाच पथके तयार करण्यात आली होती. छापे टाकले असता एकूण ३९० कोटींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये ५८ कोटींच्या रोख रकमेसह, सोन्याचे दागिने, हिरे तसंच ३०० कोटींच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. प्राप्तीकर विभागाने सर्व मालमत्ता जप्त केली असून कागदपत्रेही ताब्यात घेतली आहे. दरम्यान यामध्ये औरंगाबादमधील एका व्यापाऱ्याचाही समावेश आहे.

रोख रक्कम जप्त केल्यानंतर अधिकाऱ्यांकडून तब्बल १३ तास मोजणी सुरू होती. स्टेट बँकेत सकाळी ११ वाजता सुरूकेलेली मोजणी रात्री १ वाजेपर्यंत सुरु होती. राज्यभरातील आयकर विभागाचे २६० अधिकारी, कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. नाशिकच्या पथकाने स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने जालन्यात १ ऑगस्टला दुपारच्या सुमारास वेगवेगळ्या वाहनांतून जाऊन स्टील कारखानदारांवर आणि व्यावसायिकांच्या कार्यालयांवर तसेच निवासस्थानी छापे टाकले. एकाच वेळी वेगवेगळ्या पाच पथकांनी ही कारवाई केली. त्यात सुरुवातीला काहीच हाती लागले नाही. त्यानंतर या पथकांनी त्यांच्या शहराबाहेरील आठ ते दहा किलोमीटरवरील फार्म हाऊसकडे मोर्चा वळवला.

दरम्यान, फार्म हाऊसवर कपाटांखाली, बिछान्यांमध्ये तसेच अडगळीतील काही पिशव्यांत रोकड सापडली. सर्वत्र नोटांची बंडलेच बंडले आढळली. आणखी एका व्यावसायिकाच्या घरीही अशीच रक्कम सापडली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या