सभेहून परतणाऱ्या बोलेरोच्या धडकेत बालिकेचा मृत्यू

चालकाला अटक
सभेहून परतणाऱ्या बोलेरोच्या धडकेत बालिकेचा मृत्यू

औरंगाबाद - aurangabad

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची सभा संपल्यावर शिवसैनिकांच्या भरधाव वाहनाने मोपेडवर उभ्या कुटुंबाला चिरडल्याची घटना बुधवारी रात्री एपीआय कॉर्नर भागात घडली. या (accident) अपघातात चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला तर तिचे आई वडील जखमी आहे. या प्रकरणी (police) पोलिसांनी चालकाला अटक केली आहे. विभा उर्फ श्रावणी सतीष राऊत (वय-४ वर्षे रा. एन-६ सिडको) असे मृत चिमुकलीचे नाव आहे.

सतिश जगन्नाथ राऊत (वय ४०) त्यांची पत्नी अनिता (वय-३०) आणि त्यांची मुलगी विभा असे तिघेही (एम.एच.१५एफ.इ.४६८४) या मोपेडवर नातेवाईकाच्या घरी गेले होते.रात्री तेथून घरी परतत असताना एपीआय कॉर्नर येथील उड्डाणपुलाखालून रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात वाहने जात होती. त्यामुळे सतिश यांनी त्यांची मोपेड थांबवली व वाहने जाण्याची वाट पाहत होते.

चिमुकली विभा मोपेडच्यासमोर उभी होती. तर पत्नी अनिता पाठीमागे बसल्या होत्या. त्याचवेळी औरंगाबादकडून जालन्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या (एम.एच.२५ ए.जे. १७६९) या क्रमांकाच्या बोलेरो वाहनाचा ताबा सुटला व उड्डाणपुला खाली उभ्या सतिश यांच्या वाहनाला धडकली. बोलेरो धडकताच क्षणार्धात मोपेडच्या समोर उभी असलेली विभा दूरवर फेकल्या गेली. यावेळी विभाच्या अंगावरून गाडी गेली. अपघातानंतर चालक वासुदेव माने (रा.उस्मानाबाद) हा पळून गेला होता. नागरिकांनी त्याचा पाठलाग करून पोलिसांच्या स्वाधीन केले. बोलेरो वाहनात शिवसैनिक होते. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेवरून उस्मानाबाद येथे जात होते. चालकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असल्याची माहिती एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com