बापरे! १० लाखांची स्कूटर; फीचर्स असे जे फोर व्हीलरमध्येही नाहीत

बापरे! १० लाखांची स्कूटर; फीचर्स असे जे फोर व्हीलरमध्येही नाहीत

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

बीएमडब्ल्यूने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर काही दिवसांपूर्वी BMW Maxi-Scooter चा एक टीजर जारी केला होता. कंपनीने नुकतीच BMW maxi scooter C 400 GT भारतात लॉन्च केली आहे...

ही स्कूटर देशातील सर्वात महागडी स्कूटर असल्याचे बोलले जात आहे. याबाबत कंपनीने आपल्या ट्विटर अकाउंटवर स्कूटरचा टीजर शेअर करत माहिती दिली आहे. ही भारतातील सर्वात प्रीमियम ग्रेड स्कूटर ठरली आहे.

कंपनीने BMW Motorrad India च्या सर्व डिलरशिपवर नव्या स्कूटरचे बुकिंग सुरू केले आहे. ही स्कूटर 9.95 लाख रुपये (एक्स शोरूम) किंमतीत बाजारात दाखल झाली आहे. BMW C 400 GT स्कूटर दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात एल्पाइन व्हाइट आणि स्टाइल ट्रिपल ब्लॅक कलरचा समावेश आहे.

असे आहेत फीचर्स

  • 139 kmph टॉप स्पीड.

  • 9.5 सेकंदात 0-100 kmph चा स्पीड

  • नवं 350 cc वाटर-कूल्ड सिंगल-सिलेंडर 4 स्ट्रोक इंजिन

  • इंजिन 7500 rpm वर 34 bhp (25 किलोवॅट) पीक आऊटपूट आणि 5750 Nm वर 35 Nm टॉर्क

  • फुल LED हेडलँप्स, मोठी विंडशिल्ड, अपस्वेप्ट एग्जॉस्ट आणि मोठं अंडर सीट स्टोरेज

Related Stories

No stories found.