सेनेच्या बालेकिल्ल्यात 'आवाज' भाजपाचा!

फडणवीसांचा हल्लाबोल 
सेनेच्या बालेकिल्ल्यात 'आवाज' भाजपाचा!

औरंगाबाद- Aurangabad

महापालिका निवडणुकीच्या (Municipal election) पार्श्वभूमीवर शहराचा पाणीप्रश्न फैलावर घेत सोमवारी भाजपाने सेनेच्या बालेकिल्ल्यात (Sena's stronghold) आगामी निवडणुकीचे बिगूलच वाजवले. कधीकाळी युतीत राहून शिवसेनेसोबत सत्तेची फळे चाखणार्ऱ्या भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेविरोधात दंड थोपटत निवडणूक जिंकण्याचा निर्धार केला.

पैठणगेट येथून भाजपाने जल आक्रोश मोर्चातून सोमवारी सायंकाळी शिवसेनेच्या (Shiv Sena) बालेकिल्ल्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. 'पालिका मुख्यालय परिसरात या मोर्चाचा समारोप झाला. या मोर्चाने नेतृत्व करण्यासाठी ज्यांनी २०१९ मध्ये औरंगाबाद (Aurangabad) शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी नवीन जलयोजना मंजूर केली, ते तत्कालीन मुख्यमंत्री व सध्या राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) विशेष करून या मोर्चात सहभागी झाले होते, त्यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात भाजपाचे शहरभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या प्रमावर सहभागी झाल्या होत्या. त्या

मुळे या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधले. दरम्यान, पालिका मुख्यालयात मोर्चा पोहचेपर्यंत अंधार झाला होता. या मोर्चाला संबोधित करताना फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) व महाविकास आघाडी सरकारवर जोरदार तोफ डागत आगामी निवडणूकीत शिवसेनेला (Shiv Sena) औरंगाबादेतच काय, राज्यात सर्वत्र सत्तेतेने खाली खेचणार असल्याचा संकल्प व्यक्त केला.

शहराच्या पाणीप्रश्नावरून तोफ डागताना ते म्हणाले की, हा जल आक्रोश एक अभूतपूर्व मोर्चा ठरला आहे. २०१३ मध्ये स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली असाच मोर्चा औरंगाबादेत (Aurangabad) निघाला होता. त्यानंतर सत्तांतर झाले होते. आताही या मोर्चातून सत्तांतरण होणार, परिवर्तन घडणार हे निश्चित आहे. शिवसेनेमुळे आज औरंगाबाद शहराचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. येथे आठवड्यातून एकदाच पाणी मिळते. त्यामुळे हे जुम्मे के जुम्मे सरकार आता आपल्याला बदलायचे आहे. आमची लढाई यांच्यासोबत नसून यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. जलआक्रोश मोर्चाचे बॅनर यांनी फाडले.

मात्र हे बॅनर फाडू शकतात, लोकांना जलआक्रोश थांबवू शकत नाही. रात्री बे रात्री येथे नळांना पाणी येते. त्या माय माऊलीला पाण्यासाठी हंडा घेऊन घराबाहेर जावे लागते, तिचा शिव्या शाप तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही. हा आक्रोश मोर्चा औरंगाबादसह राज्यात परिवर्तन घडवेल. आगामी निवडणुकीत आम्ही आता औरंगाबाद जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार फडणवीस यांनी व्यक्त केला.

नवीन जलयोजनेच्या संथ कामावरून फडणवीस समाचार घेताना म्हणाले की, आम्ही १६८० कोटी रूपयांची जलयोजना मंजूर केली. त्यानंतर सत्तांतर झाले. यांनी वाटाघाटी करण्यातच सहा-सात महिने घालावले. वाटाघाटी कसल्या, यांना घाटा माहीत नाही, केवळ वाटा माहीत आहे. फक्त वाटा पाहिजे म्हणून योजनेचे काम सुरू करण्याला उशीर केला.

आजवर या योजनेसाठी यांनी तिजोरीतून एक पैसाही दिलेला नाही. केवळ केंद्राच्या पैशावरच काम सुरू आहे. यांना रस्ते कांमांसाठी ४२५ कोटी रुपये दिले. त्यातही टक्केवारीसाठी यांनी लवकर निधी खर्च केला नाही, असे म्हणत ही पालिका भ्रष्टाचाराचा अड्डा बसल्याचा घणाघात फडणवीस यांनी केला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com