मुंबई l Mumbai (प्रतिनिधी)

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज, मंगळवारपासून दोन दिवस प्रदेश भाजपच्या संघटनात्मक बैठका होत आहेत. या बैठकीत संघटनात्मक बाबी तसेच होऊ घातलेल्या महापालिका निवाफणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे.

आज पक्षाचे जिल्हा प्रभारी तसेच विविध मोर्चा आणि प्रकोष्ठ अध्यक्षांची बैठक ऑनलाईन स्वरूपात होईल. तर उद्या, बुधवारी पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची दादर येथे बैठक होणार आहे.

केंद्रीय प्रभारी सी. टी. रवी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी या बैठकांना उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पक्षाचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी दिली आहे.