Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादच्या पाणीप्रश्नी भाजपा रस्त्यावर उतरणार

औरंगाबादच्या पाणीप्रश्नी भाजपा रस्त्यावर उतरणार

औरंगाबाद – aurangabad

शहरातील अनेक भागात सहा ते आठ दिवसांआड पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. गेल्या काही दिवसांत त्यावर आंदोलनेही झाली आहेत. याच विषयावर आता (bjp) भाजपातर्फे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली शहरात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. २३ मे रोजी (Paithan) पैठणगेट पासून महानगपालिकेपर्यंत (Corporation) हा मोर्चा काढला जाईल, अशी माहिती भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल सावे (MLA Atul Save) यांनी दिली.

- Advertisement -

फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी १६८० काेटी रुपयांची योजना मंजूर केली. मात्र, ठाकरे सरकारने या योजनेच्या कामाला विलंब लावला तसेच निधी उपलब्ध करून न दिल्याने योजनेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा योजनेचे कामही अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या अडचणी वाढत आहेत. म्हणूनच या प्रश्नावर फडणवीस यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला जाणार असल्याचे सावे यांनी सांगितले.

(Marathwada) मराठवाड्यात उन्हाळ्यात नेहमी पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते. यातच औरंगाबादमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. सिडको भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा सर्वात जास्त सामना करावा लागत आहे. या विरुद्ध भाजपाकडून मागच्या आठवड्यात आंदोलन करण्यात आले होते. निवेदन देण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी महानगरपालिका आयुक्तांच्या निवासस्थानी धडक दिली होती, यामुळे आंदोलनाची चर्चा सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या