Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedBihar Election Live : भाजप सर्वात मोठा पक्ष : पुन्हा एनडीएचे सरकार

Bihar Election Live : भाजप सर्वात मोठा पक्ष : पुन्हा एनडीएचे सरकार

नवी दिल्ली

बिहार विधानसभा निवडणूक निकालाची मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीस महाआघाडी आघाडीवर होती. त्यानंतर एनडीएने आघाडी घेतील.

- Advertisement -

सकाळी मतमोजणी सुरु झाल्यावर सुरुवातीला तेजस्वी यादव यांच्या महाआघाडी आघाडी घेतली. त्यानंतर नितेशकुमारच्या नेतृत्वाखाली एनडीए आघाडीवर आले. दुपारी १२ वाजेपर्यंत एनडीए १२६ तर महाआघाडी १०२ जागांवर आघाडीवर आहे. चिराग पासवान यांचा पक्ष ४ जागांवर आघाडीवर आहे.

भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून ७३ तर नितेशकुमार यांचा राष्ट्रीय जनता दल ४३ जागांवर आघाडीवर आहे.

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी २८ ऑक्टोबरपासून ३ टप्प्यात मतदान झाले होते. आज सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली आहे.

विविध संस्थांचे एक्झिट पोलमध्ये बिहारमध्ये नितीश कुमारयांच्या नेतृत्वाखालील एनडीए विरुद्ध तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी असा थेट सामना आहे. तेजस्वी यादव यांची महाआघाडी सत्तेपर्यंत पोहचू शकतो एक्झिट पोल सांगत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या