Friday, May 10, 2024
HomeUncategorizedड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमात मोठे बदल!

ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमात मोठे बदल!

औरंगाबाद – aurangabad

(Central Government) केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स (Driving license) बनवण्याचे नियम अतिशय सोपे केले आहेत. ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये केलेल्या सुधारणांनुसार, आता तुम्हाला (rto) आरटीओला जाऊन कोणत्याही प्रकारची (Driving test) ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही. हे नियम केंद्रीय रस्ते वाहतूक आणि (Highway) महामार्ग मंत्रालयाने अधिसूचित केले आहेत, हे नियम देखील लागू झाले आहेत.

- Advertisement -

आता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओमधील चाचणीची वाट पाहावी लागणार नाही. तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त (Driving Training School) ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससाठी स्वतःची नोंदणी करू शकता. त्यांना ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि तेथे चाचणी उत्तीर्ण करावी लागेल, अर्जदारांना ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलकडून प्रमाणपत्र दिले जाईल. याआधारे अर्जदाराचे ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले जाईल.

प्रशिक्षण केंद्रांबाबत रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून काही मार्गदर्शक तत्त्वे आणि अटीही आहेत. ज्यामध्ये प्रशिक्षण केंद्रांच्या क्षेत्रापासून ते प्रशिक्षकाच्या शिक्षणापर्यंतचा समावेश आहे. हे नियम केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचित केले आहेत, हे नियम देखील लागू झाले आहेत.

नवीन नियम काय आहेत

प्रशिक्षण केंद्रांबाबत रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून काही मार्गदर्शक तत्त्वे आणि अटीही आहेत. ज्यामध्ये प्रशिक्षण केंद्रांच्या क्षेत्रापासून ते प्रशिक्षकाच्या शिक्षणापर्यंतचा समावेश करण्यात आले आहेत ते जाणून घ्या.

— अधिकृत एजन्सी हे सुनिश्चित करेल की दुचाकी, तीन चाकी आणि हलकी मोटार वाहनांसाठी प्रशिक्षण केंद्रांना किमान एक एकर जागा असली पाहिजे, तर मध्यम आणि अवजड प्रवासी मालवाहू वाहने किंवा ट्रेलरसाठी दोन एकर जागा असणे आवश्यक आहे.

— ट्रेनर किमान १२वी पास असावा आणि त्या व्यक्तिला किमान पाच वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असला पाहिजे, व वाहतूक नियमांची जाण असावी.

— मंत्रालयाने अध्यापनाचा अभ्यासक्रमही ठरवून दिला आहे. हलकी मोटार वाहने चालवण्यासाठी, कोर्सचा कालावधी कमाल ४ आठवडे २९ तासांपर्यंत असेल. तसेच या ड्रायव्हिंग सेंटर्सचा अभ्यासक्रम लेखी आणि प्रॅक्टिकल अशा २ भागांमध्ये विभागला जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या