Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedBig Breaking # अबब... अख्खे कार्यालय अडकले 'एसीबी'च्या जाळ्यात

Big Breaking # अबब… अख्खे कार्यालय अडकले ‘एसीबी’च्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर Chhatrapati Sambhajinagar

लाचखोरीच्या (Bribery)घटना सर्वत्र वाढल्या असून एखाद्या कार्यालयात रचलेल्या सापळ्यात एखादा दुसरा अधिकारी किंवा कर्मचारी जाळ्यात अडकल्याची बातमी आपण अनेकदा वाचतो. परंतु, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद (Khultabad) येथील तालुका कृषी अधिकारी (Taluka Agriculture Office) कार्यालयातील सगळे कर्मचारी (All employees) एकाच कारवाईत पकडले (Caught)गेले आहेत. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. 

- Advertisement -

ठिबक सिंचन साहित्याच्या तक्रारदार डीलरचे स्टॉक रजिस्टर चेक करण्यासाठी आणि डीलरविरोधात आलेला माहितीचा अधिकार अर्ज फाईल करण्यासाठी तसेच अमुदानप्राप्त ३५ फाईलसाठी २४ हजार ५०० रुपयांची लाच घेणाऱ्या अख्ख्या खुलताबाद तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली.

ही कारवाई २७ मार्च रोजी करण्यात आली. विशेष म्हणजे, लाच घेणाऱ्या अटकेतील आरोपींमध्ये तीन महत्त्वाचे वर्ग दोनचे अधिकारी असून एक कंत्राटी ऑपरेटरचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर वर्ग दोन पदावर काम करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना निवृत्त होण्यास अवघे काही महिने शिल्लक आहेत.

आरोपी तालुका कृषी अधिकारी शिरीष रामकृष्ण घनबहादुर (४९), मंडळ कृषी अधिकारी विजयकुमार नरवडे (५७), बाळासाहेब संपतराव निकम (५७) हे तिघेही आरोपी वर्ग दोन अधिकारी असून चौथा आरोपी सागर नलावडे (२४) हा कंत्राटी ऑपरेटर म्हणून काम करतो, अशी माहिती एसीबीचे पोलिस उपअधीक्षक दिलीप साबळे यांनी दिली.

३२ वर्षीय डीलरने कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजनेअंतर्गत विभागातील ३५ शेतकऱ्यांना कृषी ठिबक सिंचन साहित्य पुरविले होते. याबाबतच्या संचिका आरोपी कृषी अधिकारी विजयकुमार नरवडे यांच्यामार्फत सादर न करता परस्पर तपासून घेतल्या होत्या. त्यामुळे स्टॉक रजिस्टर चेक करण्यासाठी व तक्रारदार यांचे विरुद्ध आलेला माहिती अधिकार अर्ज फाईल करण्यासाठी तसेच अनुदान प्राप्त ३५ फाईलसाठी प्रत्येकी सातशे स्पये फाईल याप्रमाणे २४ हजार ५७० रुपयेची लाच अधिकाऱ्यांनी मागितली होती.

आरोपी अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार कंत्राटदार आरोपी सागर याने लाचेपोटी २४ हजार ५०० रुपये स्वीकारले. विशेष म्हणजे आरोपी बाळासाहेब निकम याने मूळ लाच मागणीशिवाय अधिकचे एक हजार रुपये स्टॉक रजिस्टर तपासण्यासाठी मागणी करून ते स्वीकारले. डीलरच्या तक्रारीवरुन एसीबीने शहानिशा केली असता आरोपी अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान,  चौघाही आरोपींना एसीबीने बेड्या ठोकल्या असून ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक विशाल खांबे, उपाधीक्षक रुपचंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली. यामध्ये पोलीस हवालदार भीमराज जीवडे, नाईक पाठक,अंमलदार शिंदे, बागुल यांनी मदत केली. 

- Advertisment -

ताज्या बातम्या