चौपदरीकरणानंतर औरंगाबाद-पैठण केवळ मिनिटात!

चौपदरीकरणानंतर औरंगाबाद-पैठण केवळ मिनिटात!

उद्या भूमिपूजन

औरंगाबाद - aurangabad

बहुप्रतिक्षेनंतर रविवारी (२४ एप्रिल) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांच्या हस्ते औरंगाबाद-पैठण (Aurangabad-Paithan) या ४४ कि.मी.च्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे भूमीपूजन होणार आहे. सध्या औरंगाबाद-पैठण हे ५० कि.मी.अंतर कापण्यासाठी वाहनधारकाला लागणाऱ्या किमान दीड ते दोन तासाच्या अवधीत बदल होणार असून काम पूर्ण झाल्यानंतर हेच अंतर कापण्यासाठी वाहनधारकांना ४० मिनिटांचा वेळ लागणार आहे.

(Dhule-Solapur Highway) धुळे-सोलापूर महामार्गाच्या धर्तीवरच भारतमाला टप्पा क्र.१ अंतर्गत नक्षत्रवाडी ते पैठणच्या भगवानबाबा (सह्याद्री) चौकापर्यंतचे ४४ कि. मी. चे हे चौपदरीकरणाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. या रस्त्याची लांबी ४४ कि.मी.असून दोन्ही बाजूने ८.५ मिटरचा रस्ता असणार आहे. मध्यभागी ३.४० मिटर रुंदी असलेले दुभाजक असणार आहे. तीन ते चार ठिकाणी बायपास असणार आहेत. भूमीपूजनानंतर या रस्त्यासाठी भू-संपादनाचे काम सुरू होणार असुन भूमीपूजनानंतर प्रत्यक्षात काम सुरू होण्यासाठी किमान सहा महिन्याचा अवधी लागू शकतो. हा रस्ता शक्‍यतो सरळरेषेत असणार असल्याने रस्त्याचे अंतर आपोआप कमी होईल.

ताशी ८० ते १०० च्या वेगाने जरी वाहन या मार्गाने चालवले तरी हे अंतर ४० मिनिटांत पूर्ण होण्यास मदत होईल. तसेच भारतमाला टप्पा क्र.२ अंतर्गत पैठण ते नगर हा रस्ता असून हा रस्ता पुढे पैठण रस्त्यालाच जोडून होणार आहे. हा रस्ता देखील कमीत कमी वळनाचा असणार असून पैठण ते नगर हे प्रवाशांना जवळ होणार आहे. मात्र, त्याला किमान वर्षभराचा अवधी लागू शकतो.

Related Stories

No stories found.