Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedभुजबळांच्या नेतृत्वात पुण्यात ओबीसी मोर्चा; आरक्षण बचावासाठी करणार एल्गार

भुजबळांच्या नेतृत्वात पुण्यात ओबीसी मोर्चा; आरक्षण बचावासाठी करणार एल्गार

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली उद्या (दि.3) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी बांधवांचा मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी यांनी दिली आहे.

- Advertisement -

ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरात शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी मोर्चा काढण्यात येणार

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा पूर्णपणे पाठींबा आहे.

मात्र मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्यात येऊ नये. त्यामुळे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करणे यासह विविध मागण्यासाठी पुणे मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार समीर भुजबळ हे करणार आहे. या मोर्चामध्ये जास्तीत जास्त ओबीसी बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी यांनी केले आहे.

या मोर्चासाठी नाशिक येथूनही मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती पदाधिकार्‍यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या