Friday, April 26, 2024
HomeUncategorizedभेंडवळची घटमांडणी ; भविष्यवाणीकडे लागले सर्वांचे लक्ष

भेंडवळची घटमांडणी ; भविष्यवाणीकडे लागले सर्वांचे लक्ष

दिपक सुरोसे

शेगाव – Shegaon

- Advertisement -

(Vidarbha) विदर्भातील (Farmers) शेतकऱ्यांचे लक्ष लागून असलेल्या सुप्रसिद्ध भेंडवळची घटमांडणी मंगळवार दि.३ मे अक्षयतृतीयेच्या दिवशी संध्याकाळी होत आहे.

दि.४ मे रोजी सकाळी (Jalgaon Jamod) जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे सकाळी ५.३० वाजता अंदाज जाहिर करण्यात येणार आहे. पूर्णा नदीच्या (river) काठी वसलेल्या या गावी घटमांडणीची परंपरा सुमारे साडेतीनशे वर्षांपासून सुरू आहे.

घटमांडणीचे भाकीत ४ मे रोजी पहाटे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे जाहीर करतील. मंगळवारी अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेर बस स्टॅन्ड शेजारच्या शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात येईल.

अशी होते घटमांडणी

घटामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर, करडी आदी १८ प्रकारचे धान्य ठेवण्यात येते. गटाच्या मध्यभागी मातीची ढेकळे त्यावर पाण्याने भरलेली घागर, पानसुपारी, पुरी, पापड, खांडोळी, कुरळी हे खाद्यपदार्थही ठेवले जातात.

रात्रभर कोणीही या ठिकाणी थांबत नाही. दुसºया दिवशी पहाटे घटांमध्ये झालेल्या बदलावरून त्याचे सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर भाकित वर्तवण्यात येते. यावरून शेतकरी पिकांचा आणि पावसाचा अंदाज वर्तवतात.

कोणत्या महिन्यात पाऊस जास्त तर कोणत्या महिन्यात पाऊस कमी सांगितला आहे यावरून शेतकरी यंदा कोणत्या पिकाची पेरणी करावी हे ठरवत असतात. चंद्रभान महाराजांच्या वंशजांनी भेंडवड घटमांडणीची परंपरा कायम ठेवली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या