Friday, April 26, 2024
HomeUncategorizedतुरुंगात असताना मिळवल्या ३१ पदव्या; बाहेर पडताच मिळाली सरकारी नोकरी

तुरुंगात असताना मिळवल्या ३१ पदव्या; बाहेर पडताच मिळाली सरकारी नोकरी

अहमदाबाद | वृत्तसंस्था

शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने तुरुंगातून पदव्या संपादन कराव्यात आणि शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर लगेचच सरकारी नोकरी मिळावी. अशा घटना कधी ऐकल्या जात नाहीत वा घडतही नाहीत. मात्र, अशी घटना नुकतीच घडली असून शिक्षा भोगून परतल्यानंतर या व्यक्तीला सरकारी नोकरीदेखील मिळाली आहे…

- Advertisement -

गुजरातमधील भावनगर शहरातील ही व्यक्ती आहे. भानुभाई पटेल असे या व्यक्तीचे नाव आहे. एका अनवधानाने घडलेल्या गुन्ह्यात तुरूंगवासाची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली होती. भानु पटेल तुरुंगात गेल्यानंतर खचून न जाता त्यांनी अभ्यास सुरु ठेवला त्यांनी 8 वर्षात 31 पदव्या प्राप्त केल्या.

शिक्षणाची आवड असलेल्या भानु पटेल यांच्याकडे तब्बल ५४ पदव्या आहेत. हिंदीमध्ये म्हणतात, सोने पे सुहागा’ अशा प्रकारे जेव्हा भानू पटेल शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर पडले तेव्हा त्यांना सरकारी नोकरीची ऑफर आली. याच वेळी त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, अद्वितीय वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्येही नोंदविले गेले.

वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया आणि युनिव्हर्सल रेकॉर्ड फोरममध्ये त्याची नोंद झाली. तुरूंगात गेल्यानंतर कैदी आपले भविष्य घडवू शकतो हे क्वचितच घडते. पण भानू पटेल यांनी हे करून दाखवले आहे.

भानु पटेल मूळचे भावनगरच्या महुवा तहसील येथील रहिवासी आहेत. बीजे मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर 1992 मध्ये ते वैद्यकीय पदवी घेण्यासाठी अमेरिकेत गेले होते.

त्याचा एक मित्र अमेरिकेत स्टुडंट व्हिसावर काम करत असताना भानुभाऊंच्या खात्यावर पगार ट्रान्सफर करायचा. या कारणास्तव, त्याच्यावर फॉरेन एक्सचेंज एक्सचेंज रेगुलेशन अॅक्ट (फेरा) कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप होता आणि त्याच प्रकरणात 50 व्या वर्षी 10 वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर त्यांना अहमदाबाद तुरूंगात पाठविण्यात आले होते.

तुरुंगातही त्यांनी धैर्य गमावले नाही. तेथेच अभ्यास करण्यास त्यांनी सुरुवात केली. शिक्षण घेत असताना केवळ 8 वर्षात त्याने 31 पदव्या त्यांनी मिळवल्या. तुरूंगात जाणाऱ्या व्यक्तीला सरकारी नोकरी मिळत नसली तरी भानुभाई पटेल यांच्या सुटकेनंतर आंबेडकर विद्यापीठाकडून नोकरीची ऑफर आली होती. भानुभाईंनीही तिथे काम करत असताना 5 वर्षात आणखी 23 पदव्या मिळवल्या. आता त्यांच्याकडे 54 पदव्या आहेत.

करोना लॉकडाऊन दरम्यान आणि तुरूंगातील आपल्या भूतकाळातील अनुभवांवरुन भानु पटेल यांनी गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषेत तीन पुस्तके लिहिली आहेत.

त्यांच्या गुजराती पुस्तकाचे शीर्षक ‘जलेना सालिया पचल नी सिद्धी’ आणि इंग्रजीत ‘बँड बार अँड बीयॉन्ड’ आहे. भानु पटेल यांनी विधानसभा निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या लेखी पुस्तकेही बाजारात दाखल झाली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या