Friday, April 26, 2024
HomeUncategorizedमेघा वट्टमवार यांची अरंगेत्रम 'ऊर्जा'

मेघा वट्टमवार यांची अरंगेत्रम ‘ऊर्जा’

औरंगाबाद – aurangabad

मुक्ता सोमण (Mukta Soman) यांच्याकडे भरतनाट्यमचे (Bharatanatyam) शिक्षण घेत असलेल्या मेघा वट्टमवार यांचे अरंगेत्रम ‘शिवशक्ती’ (Shivshakti) रसिकांना मंत्रमुग्ध करणारे ठरले. कलावर्धिनीच्या वतीने एमजीएमच्या रूक्मिणी सभागृहात भरतनाट्यम नृत्यांगणा डॉ.सुचेता भिडे-चाफेकर (Dr. Sucheta Bhide) यांच्या विशेष उपस्थितीत वट्टमवार यांनी भरतनाट्यम या नृत्यशैलीच्या विविध छटा सादर केल्या. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात मेघा यांच्या पदन्यासास दाद दिली.

- Advertisement -

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या (CIDCO) सिडकोच्या मुख्य प्रशासक दीपा मुधोळ-मुंडे (Administrator Deepa Mudhol) होत्या. भारतीय नृत्याला अभिजात परंपरा आहे. इतर नृत्यांप्रमाणेच भरतनाट्यमला शेकडो वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. या नृत्य परंपरेत शिष्याने रंगमंचावर सादरीकरण करण्यासाठी गुरूची परवानगी घेण्यासाठी कराव्या लागणाऱ्या विधीला अरंगेत्रम असे म्हणतात. गुरूने आज्ञा दिल्यावर अरंगेत्रम विधी होतो. त्यानंतर शिष्य रंगमंचावर नृत्याचे सादरीकरण करू लागतो. गणेश स्तुती आणि पुष्पांजलीने रंगमंच गुरुजन आणि उपस्थित रसिक प्रेक्षकांना वंदन करून मेघा यांनी सादरीकरणाला सुरुवात केली. त्यानंतर जतिस्वरममधून मध्य लयीतला पदन्यास खुलत गेला.

देवी स्तुतीमधून देवी पार्वतीची स्तुती सादर झाली. त्यानंतर भरतनाट्यम मार्गम मधील सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा वर्णम हा नृत्य प्रकार सादर झाला. देवी रस दृष्टी, पदम सादरीकरणातून अरंगेत्रमचे एक-एक पदर उलगडत होते. उत्तरार्धात तिल्लाना सादर झाला. द्रुतगतीतील या जोशपूर्ण रचनेसोबतच अर्ध नरेश्वरची मोहिनी रसिकांना भावली. पुष्पांजली, जतीस्वरम, देवीस्तुती, वर्णम, देवी रसदृष्टी, पदम, तिल्लाना आणि अर्ध नरेश्वरच्या सादरीकरणातून अरंगेत्रमचे एक-एक पदर उलगडत गेला.

अरंगेत्रमसाठी गायनाला शिवप्रसाद एन.एन, मृदंगावर श्रीराम सुभाराम आणि व्हायोलिनवर सतीश शेफाद्री साथसंगत केली. वेशभूषा गायत्री जांभूळकर यांची होती. यावेळी सर्वच क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या